घोडेगावात सामूहिक बुद्धवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST2021-05-28T04:09:02+5:302021-05-28T04:09:02+5:30

या वेळी बौद्धविहाराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉ. श्रीप्रकाश मारुती वाघमारे व त्यांच्या पत्नी डॉ. स्वाती वाघमारे यांच्या हस्ते करण्यात ...

Collective Buddha worship at Ghodegaon | घोडेगावात सामूहिक बुद्धवंदना

घोडेगावात सामूहिक बुद्धवंदना

या वेळी बौद्धविहाराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉ. श्रीप्रकाश मारुती वाघमारे व त्यांच्या पत्नी डॉ. स्वाती वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करून दीपप्रज्वलन घोडेगावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आचार्य महादेव वाघमारे यांच्या हस्ते करून उपस्थित नागरिकांना शिरा व खिरदान करण्यात आले. या वेळी रमाबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनंदा वाघमारे, सुनील वाघमारे, राजू वाघमारे, दीपक वाघमारे, जितेंद्र वाघमारे, किशोर वाघमारे, विजय वाघमारे, मोहन वाघमारे आदी मान्यवर व बौद्ध बंधू-भगिणी उपस्थित होते.

लहान मुलांना धम्माचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी लहान उपासकांसाठी धम्मशाळेचे ही उद्घाटन करण्यात आले. डाॅ. श्रीप्रकाश वाघमारे आणि त्यांच्या पत्नी डाॅ. स्वाती वाघमारे यांनी स्वखर्चाने बुद्धविहाराचे आणि बालउपासकांच्या धम्मशाळेचे बांधकाम केले आहे.

Web Title: Collective Buddha worship at Ghodegaon