शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अनंत चतुर्दशीला ५० हजार गणेशमूर्तींचे संकलन;पालिकेच्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 22:53 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीसाठी पालिकेने नागरिकांना गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करण्याचे आवाहन केले होते

ठळक मुद्देएकूण २०५ विसर्जन हौदांची होती सुविधागेल्या दहा दिवसांत एकूण ९४ हजार २७८ गणेशमूर्तींचे संकलन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव जसा साधेपणाने साजरा झाला तसाच विसर्जन सोहळाही साधेपणाने पार पडला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत पुण्यात एकूण ४९ हजार ३०७ गणेश मूर्तींचे हौदांमध्ये तसेच संकलन केंद्रांवर विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसांत एकूण ९४ हजार २७८ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. अनंत चतुर्दशीसाठी पालिकेने नागरिकांना गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गेल्या दहा दिवसांत नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच विसर्जन करण्यावर तसेच मूर्ती दान करण्यावर भर दिला होता. विसर्जनासाठी पालिकेने ४५ फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आवाहन केल्यानुसार नगरसेवकांमार्फत १६० फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. एकुण २०५ विसर्जन रथ होते. मंगळवारी दिवसभरात या विसर्जन रथात ३१ हजार ७५७, तर, मुर्तीदान/ संकलनातून १७ हजार ४५० अशा एकजण ४९ हजार ३०७ गणेशमूर्तींचे विसर्जन पालिकेच्या यंत्रणेमार्फत झाले. मागील वर्षी दहा दिवसांत ५ लाख २६ हजार ८७५ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा पहिल्या दिवसापासून ५७ हजार ६०० व मुर्ती दान/ संकलनामधून ४१भजार ६७८ अशा एकुण ९४ हजार २७८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. यामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत वाढ होऊ शकेल. पुणेकरांनी महापौर आणि पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नियोजन करण्यात आले होते. सर्व विभागीय कार्यालयांचे उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त यांनी संयोजन, नियोजन केले होते.--------महापौर आणि पालिका प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही काही नागरिकांनी कालव्यात आणि नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे पहायला मिळाले. निर्माल्य गोळा करण्याची यंत्रणा असतानाही नागरिकांनी रस्त्यावर निर्माल्य फेकल्याचे चित्रही शहरात पहायला मिळाले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन