कॉफी पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST2020-12-22T04:11:11+5:302020-12-22T04:11:11+5:30

पुणे : फग्युर्सन कॉलेज समोरील रस्त्यावर कार उभी करुन कॉफी पिण्यास जाणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी कारची ...

Coffee fell expensive | कॉफी पडली महागात

कॉफी पडली महागात

पुणे : फग्युर्सन कॉलेज समोरील रस्त्यावर कार उभी करुन कॉफी पिण्यास जाणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी कारची काच फोडून २ लॅपटॉप व रोकड असा १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

याप्रकरणी रोहन बोथरा (वय २५, रा. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा व्यवसाय आहे. कामाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्यांचा नाशिकचा मित्र भेटल्यानंतर ते शनिवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची कार फग्युर्सन कॉलेज गेट समोरील शिरोळे रस्त्याच्या कडेला पार्क करून स्टार बक्स कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या कारच्या डाव्या बाजूच्या कारची काच फोडून सीटवर ठेवलेले दोन लॅपटॉप व ७ हजार रुपये असा एकूण १ लाख २२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. बोथरा हे कॅफी पिऊन आल्यानंतर त्यांना हा प्रकार आढळून आला. डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Coffee fell expensive