शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

पुणे पोलिसांकडून धडाकेबाज 'कॉबिंग ऑपरेशन': एका रात्रीत १२१३ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 20:27 IST

यापुढे देखील कारवाई सुरू राहणार..

ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारीचे उच्छाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती ३२८ गुन्हेगारी टोळीतील सराईतांची तपासणी5 पिस्तुले, ४९ कोयते, तलवारी जप्त : गांजा, एमडी हस्तगत

पुणे : शहरातील गुंडगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांनी एकाच वेळी कॉबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची झाडझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी १२१३ गुन्हेगार एकाच रात्री तपासले. यावेळी केलेल्या कारवाईत शहरात आलेल्या ९ तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. गुन्हेगारांकडून ५ पिस्तुले, ४० कोयते, ५ तलवारी, कुलरी, पालघन, सुरा अशी ४९ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. संपूर्ण शहरात एकाचवेळी व इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच अशाप्रकारची ही कारवाई झाली आहे.

मंगळवारी रात्री ९ ते रात्री १ वाजेपर्यंत सर्व शहरात केलेल्या या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, लक्ष्मण बोराटे उपस्थित होते. या कारवाईत पाचही परिमंडळ व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ३० पोलीस ठाण्याचे निरीक्षक व त्यांचे कर्मचारी, गुन्हे शाखेची १० पथके, २८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी भाग घेतला.

या कारवाईत पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डवरील १२१३ गुन्हेगारांना तपाण्यात आले. त्यापैकी ५७२ गुन्हेगार मिळून आले. त्यामध्ये खास करून ‘टॉप २०’ असे ३७२ गुन्हेगार तपासले. त्यामध्ये २१५ गुन्हेगार आढळले. तसेच, परत गुन्हे करणारे ५३० आरोपी तपासले. खून व खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पॅरोल सुटलेले १२१ आरोपी तपासले असता त्यापैकी ७३गुन्हेगार आढळून आले आहेत, पाहिजे असलेले १९० गुन्हेगारांचा शोध घेतला असता त्यापैकी २ जण पोलिसांना सापडले. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५ पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत...............

३२८ गुन्हेगारी टोळीतील सराईतांची तपासणीशहरातील विविध टोळ्यांमधील रेकॉर्डवर असलेल्या ३२८ गुन्हेगारांची खंडणी विरोधी पथकाकडून तपासणी करण्यात आली. तसेच वाहन चोरी व दरोडा प्रतिबंधक विभागाने वाहनचोरीतील ४९ आरोपींची तपासणी केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भारती विद्यापीठ परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तर, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ ग्रॅम एमडी जप्त केला आहे. तसेच, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तीन महिलांची सुटका केली.

..........शहरातील गुन्हेगारीचे उच्छाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. क्राईम रेकॉर्ड अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सॅव्हिलन्स अधिकार्याची नेमणूक केली आहे. त्यातूनच या रेकॉर्डच्या आधारे गेल्या ५ वर्षातील तडीपार केलेल्या गुन्हेगारांची तपासणी या कारवाईच्या वेळी करण्यात आली. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार आहे.

अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्त