शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे काही शहरांबाबत मुख्यमंत्री गंभीर; घेऊ शकतात कठोर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 19:14 IST

रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असलेल्या शहरांबाबत लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल,असं मुख्यमंत्र्यांचं ठाम म्हणणं आहे: आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे: कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर काही शहरांबाबत निर्णय लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल,असे मुख्यमंत्र्यांचं म्हणणे आहे. दरम्यान, उद्या पुन्हा राज्यातील कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे. यानंतर लॉकडाऊन की आणखी कठोर निर्बंध लागू करायचे याबाबत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी दिली आहे.  मात्र, लॉकडाऊन जर टाळायचा असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

पुण्यात राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर भाष्य केले. टोपे म्हणाले, सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन / अंमलबजावणी राज्यात होत आहे. आजमितीला राज्यात २ लाख १० हजार सक्रिय रुग्ण असून त्यापैकी  ८५ टक्के लक्षण विरहित आहे. ०.४ टक्के मृत्युदर आहे. पण याचवेळी मुंबई, पुणे , नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रोज सरासरी ३ लाख लसीकरण होत आहे. आतापर्यंत राज्यात ४५ लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

मात्र, ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत. तसेच गुजरातमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांदरम्यान  गाईडलाईन्सची अंमलबाजवणी होताना दिसत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २००टक्के आहे. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी.आम्ही तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत रविवारी बोलणे झाले आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.......

खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी ८० टक्के खाटा ठेवण्यात येतील. तसेच नियमितपणे अपडेट केला जाईल. याचवेळी रुग्णांना वेळेत उपचार मिळेल याला प्राधान्य देणार आहे.

- आरोग्यमंत्री राजेश टोपे.

टॅग्स :PuneपुणेRajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरे