अवसरी खुर्द परिसरात ढगफुटी, ओढ्या-नाल्यांना पूर : रस्ते, पिके पाण्याखाली, पुलांचे भराव खचले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:44 IST2017-09-11T03:43:24+5:302017-09-11T03:44:43+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना रात्री मोठे पूर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पुलांचे नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Cloud cover, floods and floods flooded in Avasi Khurd area | अवसरी खुर्द परिसरात ढगफुटी, ओढ्या-नाल्यांना पूर : रस्ते, पिके पाण्याखाली, पुलांचे भराव खचले  

अवसरी खुर्द परिसरात ढगफुटी, ओढ्या-नाल्यांना पूर : रस्ते, पिके पाण्याखाली, पुलांचे भराव खचले  

अवसरी - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना रात्री मोठे पूर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पुलांचे नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील घरांमध्ये जवळपास दीड फुटापर्यंत पाणी साचले.
अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री ७.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात पावसाने उग्र रूप धारण केले. जवळपास दोन तास ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सर्वत्रच पाणीच झाले. ओढ्यांना पूर आले. ओढ्याचे पाणी पात्रात बसत नसल्याने रस्त्यावरून, शेतातून पुराचे पाणी वाहत होते. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील माती, खडी वाहून गेली आहे. शेतातील उभी पिके, शेतीचे बांध, तसेच शेतातील माती वाहून गेली आहे. पावसाचा जोर इतका मोठा होता, की अक्षरश: दोन तासांत सर्वच ठिकाणी पाणी साचले होते.
तेथील जवळपास असणाºया शेतकºयांची सरपणाची लाकडे, बाभळीची झाडे पुराच्या पाण्याने वाहून जाऊन सिमेंट मोºयांमध्ये अडकल्याने पाणी तुंबून पाण्याचा प्रवाह बदलला. त्यामुळे पुलाचा काही भाग खचला आहे. पूल वाहतुकीयोग्य राहिला नाही. पूल तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलास सिमेंट अस्तरीकरण न केल्याने पुलाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी उपसरपंच दिनेश खेडकर यांनी केला.

शेत झाले जलमय : पिके गेली पाण्याखाली

भट्टीवस्तीजवळ एक वर्षापूर्वी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. परंतु पुराचे पाणी एवढे आले, की सिमेंट बंधाºयावरून पाणी न बसल्याने बंधाºयाच्या कडेने शेतातून खोंगळ पडून तेथून पाणी वाहून थेट अनेक शेतकºयांच्या शेतात घुसले. यामुळे शेती बांध, तसेच जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. आडघरेमळा येथील बंधाऱ्याचे ढापे न काढल्यामुळे बाजीराव कामठे, वसंत शिंदे तसेच इतर शेतकºयांच्या जमिनीतील माती आणि पिके वाहून गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. अवसरी खुर्द येथील शेतकºयांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल खात्याने पंचनामे करावेत, अशी मागणी या गावचे रहिवासी आणि मंचर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत अभंग यांनी केले आहे. शेतजमिनीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच सार्वजनिक रस्ते, पूल, सिमेंट बंधारे वाहून गेले आहेत. पावसाचा केंद्रबिंदू अवसरी खुर्द आणि परिसरात होता. त्यामुळे अवघ्या दीड ते दोन तासांत सर्वत्र पाणीच पाणी साचून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शिंदेमळ्यात घरांत साचले दीड फूट पाणी
शिंदेमळ्यातील वस्तीत ओढ्याचे पाणी घुसल्याने काही घरात सुमारे दीड फूट पाणी साचले होते. तसेच रस्ते आणि शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदेमळा येथे पावसाचा केंद्रबिंदू होता. अचानक आलेल्या पुरामुळे येथील पूल वाहून गेला. यामुळे ओढ्याचे पाणी निखिल शिंदे, तुळशीराम दाते यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या घरात घुसले. त्यामुळे तेथील वस्तीवर घबराट निर्माण झाली होती. घरातील धान्य, खतांच्या गोणींचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बराकीत पाणी घुसल्याने कांदा उत्पादकाचे नुकसान झाले आहे. बाजरी, तरकारी पिके आणि तोंडल्यांच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. गावठाण-माळीमळ्यात जाणाऱ्या छोट्या पुलाचे नुकसान झाले आहे. कुंभारवाड्यातील असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यावरून पुराचे पाणी बसले नसल्याने एका बाजूचा मातीचा भराव वाहून गेला आहे. हिंगेवस्ती, चौरेमळा, शिंदेमळा, खालचा शिवार येथील ओढ्यांच्या शेजारील असणाºया शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे.

Web Title: Cloud cover, floods and floods flooded in Avasi Khurd area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी