शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील नागोरी व खंडेलवालचा क्लोजर रिपोर्ट प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:25 IST

आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरूद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. 

ठळक मुद्देसहा महिन्यांपुर्वी केला गुन्ह्यातून वगळण्याचा अर्जराकेश मारियांनी दिली होती २५ लाखांची आॅफर ?दोघांनाही या प्रकरणात डिसेंबर २०१३ मध्ये अटक

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेले आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरूद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.      दोघांनाही या प्रकरणात डिसेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. तपासात काही ठोस पुरावे न मिळाल्याने या प्रकरणी ९० दिवसांत दोषारोपत्र दाखल झाले नव्हते. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी खटला बंद करण्यासंदभार्तील अहवाल ( क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करावा, असा विनंती अर्ज आरोपींचे वकील अ‍ॅड.बी. ए. अलुर यांनी सहा महिन्यांपुर्वी दाखल केला होता. यासंदर्भात तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर मांडावे, असे आदेश त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे- पाटील यांनी दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत काही निर्णय झालेला नाही.        नागोरी याने अनेकांना बेकायदेशीररीत्या देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री केली होती. डॉ. दाभोलकर यांचा खून करणा-यांना देखील त्यांनी पिस्तुलाची विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नागोरी व खंडेलवाल यांना पुणे विद्यापीठाच्या आवारात रखवालदाराच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, खुनाच्या गुन्हातही त्यांच्याविरूद्ध पुरावे न आढळल्याने पोलिसांनी दोघांना या गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा विनंती अर्ज न्यायलयाकडे दिला होता. दाभोलकर खूनप्रकरणाचा गुन्हा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केली आहे. तावडेची सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने  जबाबात नागोरी व खंडेलवाल यांचा उल्लेखदेखील केला नाही. दोघांविरूद्ध ठोस पुरावे नाहीत, असे अ‍ॅड. अलुर यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.      डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी पकडण्यात आल्याचा दावा सध्या सीबीआय करीत आहेत. या प्रकरणात नागोरी आणि खंडेलवाल यांचा काही सहभाग नसल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर क्लोजर रिपोर्ट सादर करणे अपेक्षित आहे. रिपोर्ट सादर करण्याबाबतचा अर्ज ही सहा महिन्यांपूर्वी करण्यात आला आहे मात्र अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही, असे दोघांचे वकील अ‍ॅड. बी. ए. अलूर यांनी सांगितेल. राकेश मारियांनी दिली होती २५ लाखांची आॅफर ?डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा गुन्हा कबूल करावा यासाठी एटीएसचे तत्कालीन प्रमुख राकेश मारिया यांनी आपल्याला २५ लाख रुपयांची आॅफर दिल्याचा आरोप नागोरी व खंडेलवाल यांनी न्यायालयात केला होता. पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव असून त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगण्यानुसार आम्हाला खोटे आरोपी केल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर दोघांचीही पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांनी हा आरोप मागे घेतला होता. मात्र दोघांनी केलेल्या आरोपांमुळे मारिया अडचणीत सापडले होते तसेच पोलिसांकडून संशयितांवर गुन्हा कबुल करण्याबाबत दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली होती.नुकसान भरपाईचा दावा करणार नागोरी आणि खंडेलवाल यांचा डॉ. दाभोळकर खून प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दोघांचा या प्रकरणात काय रोल होता हे स्पष्ट झालेले नाही. असे असतानाही त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी झालेल्या मनस्तापाबाबत नुकसानभरपाई मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे, असे अ‍ॅड. अलूर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय