शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कॅँटोन्मेंट हद्दीतील बंद रस्ते खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 20:14 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच बंद रस्ते खुले करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय संरक्षण मंत्र्यांचा आदेश : नागरिकांची सोय  देशभरातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नासंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे ६३ बोर्डाच्या उपाध्यक्षांसोबत बैठकआता दोन-तीन दिवसात बंद रस्ते नागरिकांसाठी खुले होणार

पुणे : पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेले दोन रस्ते संरक्षणाच्या नावाखाली नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. हे रस्ते आता खुले करण्यात येणार आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच बंद रस्ते खुले करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घोरपडी येथील एक व वानवडी येथील एक असे दोन रस्ते खुले होणार आहे.     पुणे कॅँटोन्मेंट परिसरातील घोरपडी येथील अनंत थिएटर ते कोरेगाव पार्क रोड आणि वानवडी येथील राईट फ्लंक रोड बंद करण्यात आलेले आहेत. हे रस्ते  आता लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. या बंद रस्त्यांमुळे नागरिकांना खूप लांबून ये-जा करावी लागत असे. प्रामुख्याने घोरपडी येथील कोणाचे मयत असेल, तर त्यांना सुमारे सात किलोमीटर वळसा घालून स्मशानभूमीला जावे लागत असे. तसेच घोरपडीमधील नागरिकांना कोरेगाव पार्कला जाण्यासाठी बंद केलेला रस्ता जवळचा होता. तो बंद केल्यानंतर मुंढव्याकडून कोरेगाव पार्कला जावे लागत असे. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही खर्च होत असे. हा सर्व त्रास आता कमी होणार आहे.      दरम्यान, या रोड संदर्भात खासदार अनिल शिरोळे ह्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे जून २०१६ पासून पाठपुरावा केला होता. त्यानंतर देखील संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. देशभरातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नासंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे ६३ बोर्डाच्या उपाध्यक्षांसोबत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी उपस्थित होते. त्यामध्ये देखील या प्रश्नाबाबत चर्चा झाली होती. ---------------   गेल्या दोन-तीन वर्षांपासून घोरपडी येथील रस्ता संरक्षण विभागाने बंद केला. त्यामुळे घोरपडीमधून कोरेगाव पार्कला जाणाऱ्यांची गैरसोय झाली. स्मशानभूमीत जाण्यासाठी अंत्ययात्रा सुमारे सात किलोमीटरची होत असे. मुंढव्याकडून स्मशानभूमीत जावे लागत असे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. आता या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. - राजाभाऊ तिखे, सामाजिक कार्यकर्ते -------------------- केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे कॅँटोन्मेंट परिसरातील बंद रस्त्याबाबत सोमवारी आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन-तीन दिवसात बंद रस्ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत. घोरपडीमधील एक आणि वानवडी येथील राईट फ्लॅँक असे दोन रस्ते बंद करण्यात आले होते. - प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्ष, पुणे कॅँटोन्मेंट बोर्ड  

  

टॅग्स :Puneपुणेpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNitin Gadakriनितिन गडकरीanil shiroleअनिल शिरोळे