शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:25 IST

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतात, ही चांगली गोष्ट आहे. कुटुंब एकत्रित राहणे कधीही चांगले असते

पुणे : राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले, याचा आनंद आहे. जिवलग नाती तुटतात. पुन्हा परत एकत्र येतात, ही चांगली गोष्ट आहे. कुटुंब एकत्रित राहणे कधीही चांगले असते. असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांचे स्मृतिप्रीत्यर्थ २०२५ सालाचे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार मॉडर्न महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. 

अमृता फडणवीस म्हणाल्या,  महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना दुःखदायी आहे. शहरात, गावात स्त्रियांवर अत्याचार होत आहे. यावर राज्यकर्ते, पोलिस, न्यायालय यांना एकत्रित काम करावे. महिलांना सन्मान देणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहील. बजेटवर भार पडला तरी बहिणीसाठी ते सहन करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यात आध्यात्मिक परंपरा आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ आहे. त्यामुळे पुण्यात येऊन फार आनंद होतो. पुण्यातील प्रकृती आणि लोक याबद्दल आपुलकी वाटते. इथे काय आणखी सुधारणा करता येतील, हे मी देवेंद्रजींना सांगत असते. ते देखील पुण्याकडे लक्ष देतात. 

गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा

दत्तमंदिरात तब्बल १२८ वर्षांपासून प्रत्येक जण श्रद्धा व सेवेसाठी येतो. खरी मानवता काय आहे, हे विश्वस्तांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा, यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पाठीमागे लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांचा हातभार होता. लक्ष्मीबाई या शांतपणे परिवर्तन घडवून आणत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMNSमनसेShiv Senaशिवसेना