शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या मार्केट यार्डामधील गुळाचे लिलाव बंद : ई-नाम व ई-लिलाव पध्दतीचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:38 IST

पुण्याच्या बाजारपेठांमधील गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ सुरु असलेली गुळाच्या लिलावाची पध्दत अखेर बंद पडली आहे.

ठळक मुद्दे शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे आदेश शेतकऱ्यांनी जागेवार थेट व्यापारी व आडत्यांना गुळाची विक्री केली सुरु ऑनलाईन पद्धतीने गुळ खरेदी करण्यास व्यापारी नाही तयार

पुणे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार योजने अंतर्गत पुण्याच्या बाजारपेठांमधील गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ सुरु असलेली गुळाच्या लिलावाची पध्दत अखेर बंद पडली आहे. पुणे बाजार समितीच्या वतीने गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार बाजारात ई-नाम व ई-लिलावची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. ई-लिलाव पध्दतीमुळे प्रत्यक्ष मालाचा दर्जा कळत नसल्याने व्यापाºयांनी थेट शेतक-यांकडे जाऊन माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मार्केट यार्डामध्ये सुरु असलेले गुळाचे ३० ते ४० लिलाव देखील बंद पडले आहेत. याचा फटका शेतक-यांना बसणार असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले. याबाबत दि. पुणे जॅगरी मर्चट्स अससोसिएशनचे अध्यक्ष अजित सेठिया यांनी सांगितले की, पुण ेकृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजर योजने अंतर्गत ई-नाम योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे लेखी पत्र सर्व आडते व व्यापाºयांना दिले. याची अंमलबजावणी न करणाऱ्या अडत्यांवर कारवाई करण्यात येईल अशा इशारा देखील दिला आहे. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ई-नामच्या माध्यमातून गुळाचा लिलाव देखील ऑनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश दिले आहेत. परतं आॅनलाईनवर गुळाचा दर्जा व इतर गोष्टी लक्षात येत नाही. यामुळे ऑनलाईन पद्धतीने गुळ खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत. याशिवाय गुळाची गाडी व वाहतूकच भाडे देखील व्यापारी या ई-नाम पध्दतीमुळे रोख स्वरुपात देऊ शकत नाहीत. तसेच इतर अनेक अडचणी असल्याचे गुळाच्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु याबाबत कोणताही तोडगा काढला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आता जागेवार थेट व्यापारी व आडत्यांना गुळाची विक्री सुरु केली आहे. यामुळे स्पर्धा कमी झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे अजित सेठिया यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड