शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकासह लिपिक अटकेत

By admin | Updated: December 12, 2014 00:09 IST

चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींचा जामीन करून देण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकानेच मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणो : चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींचा जामीन करून देण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकानेच मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण आणि वरिष्ठ लिपिक दीपक ज्ञानोबा राऊत (वय 51, रा. कसबा पेठ) याला अटक केली आहे. या कामासाठी राऊत याने निम्हणकडून तब्बल 15 लाख रुपये घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
तानाजी निम्हण यांची मुले तुषार आणि चेतन या दोघांनी चुलत भाऊ प्रतीक रामभाऊ निम्हण (वय 19) याचा 12 एप्रिल 2क्13 रोजी रात्री गोळ्या झाडून खून केला होता. या गुन्ह्यात तुषार व चेतन येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. दोघांनाही जामीन मिळत नसल्यामुळे शेवटी तानाजी निम्हण यांनी न्यायालयामधील वरिष्ठ लिपिक राऊत याला हाताशी धरले. मुलांच्या जामिनाचा बनावट आदेश तयार करून त्यावर न्यायालयाचा सही-शिक्का देण्यासाठी त्याने 15 लाख रुपये घेतले. राऊत याने न्यायालयाच्या संगणकातील अन्य गुन्ह्यांमधील जामिनाचा मजकूर जसाच्या तसा  ‘कॉपी-पेस्ट’ करून आरोपींच्या जामिनाचा नवीन आदेश तयार केला. त्यावर आरोपींची नावे टाकून दस्त तयार केला. या सर्व कागदपत्रंवर न्यायालयाचा सही व शिक्का मारून तयार केलेला जामीन आदेशाचा 2क् नोव्हेंबरच्या तारखेचा लखोटा स्वत: तानाजी यांच्यासोबत जाऊन 22 नोव्हेंबरला येरवडा कारागृहात टाकला. त्याआधारे आरोपींचा जामीन करवून घेतला. येरवडा कारागृहामधील काही अधिकारी आणि कर्मचा:यांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी गुरुवारी कारागृहामध्ये जाऊन तपास केला. (प्रतिनिधी)
 
4बनावट जामीन करुन देण्यासाठी न्यायालयाची फसवणूक करुन दीपक राऊतने तानाजी निम्हणकडून पंधरा लाख रुपये घेतले. ही रक्कम त्याने पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईमधील डान्स बारमध्ये उडवल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले. न्यायालयातील डय़ुटी संपल्यानंतर राऊत मित्रंना फोन करुन बोलावून घेत असे. खासगी मोटारीने हे सर्वजण डान्सबारमध्ये जात असत. तेथे मौजमजा करुन सकाळी पुन्हा परत येत असत. पंधरा लाख रुपये खर्च होईर्पयत दोन महिने राऊतची ‘जिवाची मुंबई’ सुरू होती.