शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग तरुणांचा स्वच्छतेचा ध्यास; पुण्यातील शिवाजीनगर परिसर केला चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 12:38 IST

दिव्यांग’ तरुणांनी शिवाजीनगर बस स्टॅँड स्वच्छ करण्याचे ठरवले आणि त्याची सुरुवातही केली. कुबड्या घेतलेले हे तरुण कचरा जमा करीत असल्याचे पाहून तेथील नागरिकांनीही त्यांना मदत करत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 

ठळक मुद्देकुबड्या घेतलेले हे तरुण कचरा जमा करीत असल्याचे पाहून नागरिकांनीही घेतला सहभाग या तरुणांसोबत ‘दिव्यांग्ज युथ विल पॉवर’ या ग्रुपचे सर्व दिव्यांग सभासदही सहभागी

पुणे : ‘मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर, लोग साथ आते गये और कारवां बनता गया !’ या मजरूह सुलतानपुरी यांच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव ‘दिव्यांग’ तरुणांनी  रविवारी सकाळी घेतला. निमित्त होते स्वच्छता अभियानाचे. या तरुणांनी शिवाजीनगर बस स्टॅँड स्वच्छ करण्याचे ठरवले आणि त्याची सुरुवातही केली. कुबड्या घेतलेले हे तरुण कचरा जमा करीत असल्याचे पाहून तेथील नागरिकांनीही त्यांना मदत करत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वच्छतेविषयीचा एक व्हिडीओ अमोल शिनगारे आणि महेश मिस्त्री या दिव्यांग तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिला. रविवार असल्याने त्यांनीदेखील हा वेळ चांगल्या कामासाठी खर्च करण्याचे ठरविले. त्यांना त्यांचे मित्र बालाजी मोरे, रामा चलवादी, आणि सागर भारत यांनीही सहकार्य केले. त्यातून आज सकाळी आठ वाजता हे दिव्यांग तरुण शिवाजीनगर येथील बस स्टॅँडवर गेले. त्यांनी बस स्टॅँड आणि बॅँक आॅफ महाराष्ट्रासमोरील पीएमपीचा बस स्टॉप स्वच्छ केला. त्यांचे हे काम पाहून तेथील नागरिकही त्यांच्यासोबत स्वच्छता करण्यात सहभागी झाले. तसेच या तरुणांसोबत ‘दिव्यांग्ज युथ विल पॉवर’ या ग्रुपचे सर्व दिव्यांग सभासदही सहभागी झाले. शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक काहीतरी वेगळे करण्याची या तरुणांची इच्छा होती. त्यातून त्यांनी हा उपक्रम राबविला. समाजात या दिव्यांगांकडे सहानुभूतीने पाहिले जाते. परंतु, या दिव्यांगांना सहानुभूती नको असते. त्यांच्यातही वेगळे काहीतरी करण्याची धमक आणि ऊर्जा असते. हेच त्यांनी या उपक्रमातून दाखवून दिले. सर्व कचरा जमा केल्यानंतर त्यांनी तो तिथेच एका ठिकाणी जमा न करता थेट घोले रोड येथील कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला.

टॅग्स :Puneपुणे