प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दावडीच्या किल्ल्याची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:42+5:302021-02-05T05:10:42+5:30
किल्ला व परिसरात प्रवेशद्वारावरील व बुरुजावरील झाडेझुडपे व गवत वाढले होते. त्यामुळे विद्रूप दिसत होते. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचा ...

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दावडीच्या किल्ल्याची साफसफाई
किल्ला व परिसरात प्रवेशद्वारावरील व बुरुजावरील झाडेझुडपे व गवत वाढले होते. त्यामुळे विद्रूप दिसत होते. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार व परिसरातील झाडेझुडपे, गवत काढून हा परिसर स्वच्छ केला.
तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी येथे बडोद्याचे श्रीमंत गायकवाड सरकार यांचा भुईकोट किल्ला आहे. किल्ल्यामधील राजवाड्यात अजूनही गायकवाडांची गादी आहे. मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने मानस व्यक्त केला. या वेळी प्रतिष्ठानचे सुरेश डुंबरे, बाबासाहेब दिघे, गणेश म्हसाडे, गोरक्ष म्हसाडे, बंटी साबळे, गुलाब सुतार आणि पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठानचे चेतन पाटील, करण सुतार, रंगराव झुंजार, विशाल वाघोले, समीर वाघोले आदींनी मोहिमेत भाग घेतला.
२७ दावडी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी श्रमदान करून किल्ल्याची साफसफाई केली