सात दिवसांत कार्यालये स्वच्छ करा
By Admin | Updated: September 18, 2014 00:08 IST2014-09-18T00:08:45+5:302014-09-18T00:08:45+5:30
डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून येत असल्याने या सर्व इमारतींची स्वच्छता येत्या सात दिवसांच्या आत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले आहेत.

सात दिवसांत कार्यालये स्वच्छ करा
पुणो : शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह इतर पालिका इमारतींमध्येही डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून येत असल्याने या सर्व इमारतींची स्वच्छता येत्या सात दिवसांच्या आत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले आहेत. तसेच या कार्यालयांमध्ये पडलेल्या भंगाराच्या साहित्याची
विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्या विरोधात पालिका प्रशासनाने डेंग्यूू हटाव मोहीम हाती घेतली असली, तरी शहरात पालिकेच्या मालकीच्या असलेल्या इमारतींमध्ये तसेच व्हेईकल डेपो आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात कारवाई मध्ये जप्त केलेले तसेच इतर साहित्य मोठय़ा प्रमाणात साठले आहे.
या ठिकाणी आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत या कार्यालयांमध्येही डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून आली आहे.
त्यामुळे महापालिकेच्या इमारतींपासूनच डेंग्यू निर्मूलन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, पालिकेची सर्व 15 क्षेत्रीय कार्यालये, उद्याने तसेच व्हेईकल डेपोमध्ये असलेले भंगार आणि साठलेले टायर्स तत्काळ भंगारात काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच बांधकाम विभाग आणि भवन विभागाने संयुक्तपणो ही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, हे काम येत्या सात दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. तसेच हे काम
पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांच्या
आत विभागप्रमुखांनी हे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अतिरिक्तांना सादर करावयाचे आहे. हे डेंग्यूचे निर्मूलन करतानाच त्या परिसरातील कच:याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही क्षेत्रीय कार्यालयांची असणार आहे. (प्रतिनिधी)
..तर क्षेत्रीय अधिका:यांवरही दंडात्मक कारवाई
4हे सफाईचे काम सात दिवसांनी पूर्ण झाल्यानंतर विभागप्रमुखांनी काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा त्या परिसराची तसेच महापालिकेच्या इमारतींची पाहणी केली जाईल.
4या पाहणीत डासांची पैदास अथवा घाणीची ठिकाणो आढळल्यास तत्काळ संबंधित विभागप्रमुखास नोटीस बजाविली जाईल. त्यानंतर ही अस्वच्छता दूर करण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्या कालावधीत स्वच्छता न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या बाबतचे आदेश नुकतेच सर्व क्षेत्रीय कार्यलये तसेच विभागप्रमुखांना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.