अभिजात संगीत जपण्याचा प्रय}
By Admin | Updated: December 9, 2014 23:56 IST2014-12-09T23:56:39+5:302014-12-09T23:56:39+5:30
पुण्याचा वैभवशाली असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावण्याची संधी मिळावी, ही युवा, नवोदित कलाकारांची फार मोठी इच्छा असते.

अभिजात संगीत जपण्याचा प्रय}
पुणो : पुण्याचा वैभवशाली असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावण्याची संधी मिळावी, ही युवा, नवोदित कलाकारांची फार मोठी इच्छा असते. ज्येष्ठ कलावंत, साथसंगत करणा:या कलावंतांबरोबरच नव्या कलाकारांनाही स्वरमंच उपलब्ध करून दिला जात आहे. हे सुद्धा महोत्सवाचे वेगळेपण म्हणावे लागेल. दिग्गज कलाकारांना साथसंगत करणारी ही तरुण पिढी अभिजात संगीत जपण्याचा प्रय} करीत आहे.
स्वपA पूर्ण होणार
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आजर्पयत अनेक कलाकारांनी आपल्या अथक परिश्रमांनी हा अभिजात वारसा जतन करून समृद्ध केलेला आहे. याच पंगतीतील एक कलावंत आहेत तबलावादक अविनाश पाटील. या वर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवात गायिका सानिया पाटणकर यांना साथसंगत करणार आहेत. पाटील यांना अनेक पिढय़ांची वारकरी व संगीताची समृद्ध परंपरा लाभली आहे. आजोबा गोपाळराव
पाटील व वडील पं. प्रमोद पाटील यांच्याकडून त्यांना तबल्याचे बाळकडू मिळाले आहे. घरची परिस्थिती बेताचीच, पण जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संगीताचा ध्यास यांवर तबलावादनातील सुवर्णपदक मिळविले. पं. उमेश मोघे यांच्याकडे त्यांनी तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. पं. राजन-साजन मिश्र, पं. रोणू मुजुमदार, डॉ. मोहन दरेकर, देवकी पंडित, पं. जयतीर्थ मेवुंडी अशा दिग्गज कलाकारांना त्यांनी साथ केली आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होण्याचे स्वपA पूर्ण होणार असल्याचे ते सांगतात.
त्या दिवसाविषयी प्रचंड उत्सुकता
युवा हार्मोनियम-वादक रोहित मराठे हे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वरमंचावर हजेरी लावणार आहेत. सानिया पाटणकर यांना ते साथ करणार आहेत. कमी वयात संधी मिळत असल्याबद्दल वेगळेच समाधान असल्याचे ते म्हणतात. मूळचे वाईचे असलेले मराठे संगीताची आवड असल्याने दहावीनंतर पुण्यात
आले. पुढील शिक्षण त्यांनी
पुण्यातच घेतले. हार्मोनियम वादनाचे शिक्षण त्यांनी प्राचार्य प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. ‘सवाई’मध्ये सहभागाची संधी मिळाली, त्याबद्दल गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, असे ते म्हणतात. तो दिवस कसा असेल, याविषयी प्रचंड उत्सुकता आहे, असे ते सांगतात. पं. विजय कोपरकर, पं. कैवल्यकुमार, पं. रघुनंदन पणशीकर, विदुषी
मंजिरी आलेगावकर यांना रोहित मराठे यांनी हार्मोनियमची साथ केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील हार्मोनियम वादनाचे त्यांना पहिले पारितोषिक मिळालेले आहे.
संधी मिळेल
ही अपेक्षा होतीच
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कश्यप बंधू या गायकांना संतोष घंटे हे हार्मोनियमची साथ करीत आहेत. पहिल्यांदाच सवाईमध्ये संधी मिळाल्याचा त्यांना आनंद आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, लहानपणापासून संगीताची आवड होती. शिक्षण सुरू असताना 16व्या वर्षी सवाई महोत्सवाला मित्रंबरोबर गेलो होतो; पण तिकीट नसल्याने त्या कार्यक्रमात हाकलून देण्यात आले होते. त्याच सवाई महोत्सवात साथ करण्याची संधी मिळत आहे, ही अभिमानाची गोष्ट वाटते. मी आणि परमेश्वर कांबळे यांनी लिहिलेल्या आप्पा जळगावकर यांच्यावरील पुस्तकाचे तीन वर्षापूर्वी सवाईच्या मंचावर पं. जसराज यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे, हीसुद्धा समाधानाची गोष्ट आहे. आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, उस्ताद अक्रम हुसेन खॉँ, अस्लम हुसेन खा, पं. बिरजूमहाराज यांना साथसंगत केली असून, कर्नाटकातील सवाई महोत्सवातही हजेरी लावली आहे.