शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दहावीची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल; मुंबईत गुन्हा दाखल, प्रकाशकांकडून गैरफायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:04 IST

आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत.

ठळक मुद्देतपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारती संचालक सुनील मगर यांनी केले स्पष्टबालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष

पुणे : आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत. गाइड, व्यवसाय माला व इतर साहित्य प्रकाशित करणाऱ्या खासगी प्रकाशकांकडून याचा गैरफायदा घेतला जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यातील काही पुस्तके व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने याप्रकरणी मुंबईच्या दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.       शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गेल्या तीन-चार दिवसांपासून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाचे विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे भाग एक व भाग दोन अशी दोन पुस्तके शिक्षकांच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली होती. या पुस्तकफुटीचा सर्वाधिक गैरफायदा खासगी प्रकाशकांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे. अधिकृत पुस्तके बाजारात येण्यापूर्वीच व्हाइरल झालेल्या पोस्टच्या आधारे त्यांच्याकडून पुस्तके बाजारात आणण्याची शक्यता आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसू शकतो, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर खासगी क्लासचालकही त्याआधारे विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये शिकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालभारतीकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ही पुस्तकफुटी कशी झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. सायबर शाखेकडून त्याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.  

दहावीची पुस्तके लवकर बाजारात उपलब्ध व्हावीतदहावी हे बोर्डाचे वर्ष असल्याने त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून नववीपासूनच केली जाते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांचे त्याकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे बालभारतीच्या दहावी अभ्यासक्रमाच्या नवीन पुस्तकांचे काम पूर्ण झाले असल्यास त्यांनी त्याबाबत गुप्तता न बाळगता ती तातडीने बाजारात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून झालेल्या पुस्तकफुटीमुळे निर्माण झालेला संभ्रम त्यामुळे दूर होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपcyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईPuneपुणे