शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पुलंचे वाङ्मय जपानी विद्यार्थ्यांच्या मुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 4:24 AM

मासाहारू तोयोहारा हा जपानच्या शाळेतील विद्यार्थी सिंहगड रस्त्यावरच्या पु. ल. देशपांडे उद्यानात उभा राहिला आणि त्याने थेट पुलंची कथा व तीही चक्क मराठीतून सुरू केली.

पुणे : मासाहारू तोयोहारा हा जपानच्या शाळेतील विद्यार्थी सिंहगड रस्त्यावरच्या पु. ल. देशपांडे उद्यानात उभा राहिला आणि त्याने थेट पुलंची कथा व तीही चक्क मराठीतून सुरू केली. ती संपल्यावर झालेला टाळ्यांचा कडकडाट विरतोय न विरतो तोच त्याने व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ही तितक्याच ताकदीने सुरू केली आणि उपस्थितांना चकित केले.‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान, पुणे’ या संस्थेने पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु. ल. देशपांडे उद्यानात रविवारी सकाळी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सन १९६०मध्ये पुलंनी मराठी मनाला आपल्या ‘पूर्वरंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून जपानची ओळख करून दिली होती त्याचे स्मरण या वेळी सर्वांनाच झाले. पुलंबरोबरच माडगूळकर व अन्य काही साहित्यिकांच्या साहित्यकृतींचेही वाचन या वेळी करण्यात आले. काही जपानी विद्यार्थ्यांबरोबरच जपानी भाषा शिकणारे मराठी विद्यार्थीही यात सहभागी होते. जपानमधील एका शहराच्या सहकार्यानेच पु. ल. देशपांडे उद्यान साकारण्यात आले असल्याने या सगळ्याच कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली.संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. समीर खळे, मुंबईतील जपानी वकिलातीमधील वरिष्ठ अधिकारी युकिओ अचिदा, माजी अधिकारी हिरोबुगी नाकाजिमा, पुण्यात जपानी भाषेचा शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मिचिको तेंडुलकर, जपानमधील वाकायम प्रांताचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी तात्सुनोरी ओनिशी, संस्थेच्या समन्वयक स्वाती भागवत, सचिव आमोद देव, जयश्री भोपटकर या वेळी उपस्थित होते. श्रद्धा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.मन हेलावणाºया सत्यकथालोकप्रिय जपानी कथा, कविता, हायकू यांचा मराठी अनुवाद व त्याचे अभिवाचनही काही जणांनी सादर केले. सलील वैद्य यांनी दुसºया महायुद्धातील ३ हत्तींच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या सत्यकथेने नागरिकांची मने हेलावली.बकुल वैद्य, सिद्धी जोशी, मुग्धा भालेराव यांनी एक जपानी कथा सांगितली. चेतना गोसावी, श्रीमती स्वाती भागवत, अद्वैता उमराणीकर, मीना हुननूरकर, जयश्री भोपटकर, स्वराली बापट आदींनी यांनी जपानी हायकूंचा सुरेख अनुवाद सादर केला. काही कथाही त्यांनी ऐकवल्या.

टॅग्स :P L Deshpandeपु. ल. देशपांडेJapanजपान