विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST2021-07-15T04:10:12+5:302021-07-15T04:10:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मध्यवस्तीतल्या एका महाविद्यालयातील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडे ...

Clark arrested for demanding physical comfort from student | विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला अटक

विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मध्यवस्तीतल्या एका महाविद्यालयातील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावरून संतापलेल्या पालकांनी महाविद्यालयातील पर्यवेक्षकाला (क्लार्क) काळे फासत मारहाण केली. अभिजित पवार असे आरोपी क्लार्कचे नाव आहे.

संतप्त पालकांनी पवारला मारहाण करत महाविद्यालयापासून विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली. विश्रामबाग पोलिसांनी क्लार्कला अटक केली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले की, बिबवेवाडीत राहणारी एक १८ वर्षांची विद्यार्थिनी मध्य वस्तीतील नामांकित महाविद्यालयात बारावीत शिकते. तिने गुणपत्रिकेसाठी मंगळवारी पवारशी संपर्क साधला होता. त्या वेळी त्याने पुढील वर्गातील प्रवेशासाठी अंतर्गत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून कोठे प्रवेश घ्यायचा आहे, अशी विचारणा केली. तेव्हा या विद्यार्थिनीने पोलीस व्हायचे असल्याचे सांगितले.

त्यावर पवार याने तिच्याकडे वाईट नजरेने पाहून लज्जास्पद बोलून शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराने ही विद्यार्थिनी घाबरून गेली. महाविद्यालयातून ती घरी गेली. परंतु, पवारच्या मागणीमुळे तिला रात्रभर झोप आली नाही. बुधवारी (दि. १४) सकाळी तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. तिने आपल्या पतीला हे सांगितले. त्यानंतर संतप्त पालक दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात गेले. त्यांनी पवारकडे या प्रकाराचा जाब विचारला. त्याला काळे फासले. त्याला मारहाण करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात घेऊन आले, असे टिकोळे यांनी सांगितले.

Web Title: Clark arrested for demanding physical comfort from student