शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शहराचे पार्किंग धोरण पडले अडगळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:12 IST

निवडणुकांच्या तोंडावर अडचणीचा ठरणारा पार्किंग धोरणाचा विषय सत्ताधा-यांसोबत प्रशासनाने देखील अडगळीत टाकाला असल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देसत्ताधा-यानंतर आता प्रशासनही धोरणासाठी निरुत्साही या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ७ अभियंत्यांचा स्वतंत्र कक्ष स्थापन होता केला या धोरणासाठी लोकप्रतिनिधींसह, प्रशासनानेही काढता पाय घेतला असल्याचे स्पष्ट विरोधीपक्षांनी केली या धोरणावरून सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी

पुणे: शहरात वाढलेली वाहनांची प्रचंड संख्या व होणारी भयानक वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सत्ताधा-यांचा विरोध डावलून तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांनी शहरासाठी स्वतंत्र पार्किंग धोरण तयार मुख्यसभेच्या मंजुरीसाठी ठेवले होते. या धोरणावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा करून काही बदल करत धोरण मंजूर देखील करुन घेण्यात आले. त्यामुळे या धोरणांची अंमलबजावणीसाठी एप्रिल २०१८ मध्ये कुणाल कुमार यांच्या आदेशाने तब्बल ७ अधिका-यांचा स्वतंत्र कक्ष स्थापन केला. परंतु अद्याप या कक्षाचे कामच सुरु झाले नसल्याचे समोर आले आहे. निवडणुकांच्या तोंडावर अडचणीचा ठरणारा पार्किंग धोरणाचा विषय सत्ताधा-यांसोबत प्रशासनाने देखील अडगळीत टाकाला असल्याचे समोर आले आहे. शहरातील खासगी वाहनांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर पार्किंग धोरण प्रस्तावित केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात पार्किंग शुल्क प्रस्तावित केले होते. या शुल्कामुळे नागरिक रस्त्यावर खासगी गाड्या आणणार नाहीत, तसेच सार्वजनिक वाहने वापरतील या उद्देशाने हा प्रस्ताव ठेवला असल्याचे तत्कालीन आयुक्तांकडून सांगण्यात येत होते. मात्र, हे शुल्क मोठ्या प्रमाणात असल्याने विरोधीपक्षांनी या धोरणावरून सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी केली. त्यामुळे भाजपनेही या प्रस्तावास नकार दर्शविला. त्यामुळे तत्कालीन आयुक्त कुमार यांनी या प्रकरणी भाजप पदाधिका-यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत त्यांच्याकडून हा प्रस्ताव भाजप पदाधिका-यांनी मंजूर करावा यासाठी दबाव आणला. त्यामुळे सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, त्याचवेळी या धोरणात प्रस्तावित केलेले पार्किंग शुल्क तसेच पहिल्या टप्प्यात प्रमुख पाच रस्त्यांवरच या योजनेची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करावी अशी उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, त्यानंतर महापौरांचा अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची समितीही नेमण्यात आली. मात्र, या समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही. असे असतानाच पालिका प्रशासनाने या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ७ अभियंत्यांचा स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. हा कक्षच अद्याप अस्तित्वात आलेला नाही. या कक्षाची जबाबदारी देण्यात आलेल्या तीन अधिका-यांची इतर खात्यात बदली झाली. त्यामुळे त्यांनी कक्षाचे कामच केले नाही. परिणामी हा कक्षच अस्तित्वात आलेला नसल्याचे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे या धोरणासाठी लोकप्रतिनिधींसह, प्रशासनानेही काढता पाय घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगkunal kumarकुणाल कुमारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा