बोचऱ्या थंडीने शहर गारठले
By Admin | Updated: January 14, 2015 03:12 IST2015-01-14T03:12:30+5:302015-01-14T03:12:30+5:30
थंडीच्या कडाका वाढला असतानाच शहरामध्ये सध्या पहाटे धुक्याची दुलई दाटून येत आहे. सकाळी ६ पर्यंतही धुके कायम

बोचऱ्या थंडीने शहर गारठले
पिंपरी : थंडीच्या कडाका वाढला असतानाच शहरामध्ये सध्या पहाटे धुक्याची दुलई दाटून येत आहे. सकाळी ६ पर्यंतही धुके कायम राहत असून, धुके व बोचऱ्या थंडीचा प्रत्यय शहरवासीयांना येत आहे.
शहराचे तापमान सध्या खूपच घटले आहे. मागील २ दिवसांत ते ७.२ अंश सेल्सीयस इतक्या नीचांकीपर्यंत घसरले आहे. त्यामुळे आजवर गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या शहरवासीयांसाठी आता ही थंडी बोचरी वाटू लागली आहे. थंडीचा त्रास रात्री आणि पहाटे अधिक जाणवत आहे. त्यातच पहाटे शहराच्या पाणथळ भागांमध्ये तसेच सखल परिसरात धुक्याची दुलई दाटून येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. या थंडीत व धुक्याच्या वातावरणात सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. आगामी २४ तासांमध्ये परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)