नगररचना विभाग अभियंत्यांची बदली

By admin | Published: July 14, 2016 12:35 AM2016-07-14T00:35:32+5:302016-07-14T00:35:32+5:30

महापालिकेच्या नगररचना विभागातील सहा कनिष्ठ अभियंत्यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली असून, दोन दिवसांत रुजू होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.

City Engineer Engineer Replacements | नगररचना विभाग अभियंत्यांची बदली

नगररचना विभाग अभियंत्यांची बदली

Next

पिंपरी : महापालिकेच्या नगररचना विभागातील सहा कनिष्ठ अभियंत्यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली असून, दोन दिवसांत रुजू होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश विभागप्रमुखांना दिला आहे.
महापालिकेच्या ‘नगररचना आणि बांधकाम विभागातील रात्रीस खेळ चाले...’ यावर ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले होते. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ही कार्यालय सुरू राहत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. त्यातील अधिकारी आणि पदाधिकारी, वास्तुरचनाकार यांच्यातील साटेलोटे उघडकीस आणले होते. त्यानंतर सर्वसाधारण सभेत याबाबतचे प्रकरण गाजले होते. नगरसेवकांनी कारवाईची मागणी केली होती.
आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर या विभागाला सहानंतर टाळा लागत असल्याचे चित्र दिसून आले. राजकारणी आणि अधिकारी यांच्यातील लागेबांधे यामुळे या विभागात अनेकजण वर्षानुवर्षे एकाच जागेवर आहेत. त्यामुळे त्यांची मनमानी सुरू असते. याबाबतच्या आलेल्या तक्रारींची गंभीर दखल आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतल्याची दिसून येत आहे. त्यामुळे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नगररचना, बांधकाम परवाना विभागाविषयी तक्रारी वाढल्या होत्या. नगररचना विभागात सावळा गोंधळ सुरू असून, या विभागातील कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका अनिता तापकीर यांनी आयुक्तांकडे केली होती. तसेच सर्वसाधारण सभेतही अधिकाऱ्यांच्या कामकाजाची आणि एकाच जागेवर अनेक वर्षे ठिय्या मांडून असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी नगररचना विभागातील सन्मान भोसले, विजय लांडे, अशोक मगर, चेतन देसले, सचिन लोणे, बिपीन थोरमोठे या अभियंत्यांची बदली पाणीपुरवठा विभागात केली आहे. १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कार्यभार हस्तांतरण करून
तसा अहवाल विभागप्रमुखांना सादर आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: City Engineer Engineer Replacements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.