शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कृषी सेवा केंद्र, खते, बियाणे व कीटकनाशक दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:36 IST

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश ; हाॅटस्पाॅट ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार....

पुणे : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून, ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेती कामांना वेग आला आहे. परंतु सध्या जिल्ह्यात असलेल्या लाॅकडाऊन व वेळेच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून अखेर बुधवार(दि.19) पासून शहर आणि जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र, खते, बि-बायाणे व कीटकनाशके,औषधांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान हाॅटस्पाॅट गावांतील दुकानाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे देखील देशमुख यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी पूर्व तयारी ची कामे देखील सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि रासायनिक खते देण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी ग्रामीण भागातील खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने आता दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी राहतील.सध्या हाय अलर्ट आणि हॉटस्पॉट नसलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. मात्र खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.

पुणे शहरामध्ये ही रासायनिक खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांच्या दुकानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात संदर्भातील आदेश महापालिका आयुक्तांच्या स्तरावरून काढला जाणार आहे. शेतकऱ्यांना पेरणी पूर्वतयारीसाठी बी बियाण्यांची खरेदी तसेच रासायनिक खतांचा पुरवठा तसेच खरेदी यासाठी ही वेळ वाढवण्यात आली आहे.---------शेतकऱ्यांची अडचण दूर होईल सध्या संपूर्ण जिल्ह्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. परंतु लाॅकडाऊन व दुकानांच्या वेळेमुळे शेतक-यांना आवश्यक बी-बियाणे व खते मिळण्यास प्रचंड अडचण निर्माण होत होती. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वेळेत बि-बियाणे व खते उपलब्ध होतील.- बाबुराव वायकर, कृषी सभापती जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीRainपाऊस