शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आता दंड ऑनलाइन भरता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 21:52 IST

आजपर्यंत ही रक्कम रोख स्वरूपात घेण्यात येत होती, आता ही दंडाची रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने खुली ठेवणे, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न ठेवणारे दुकानदार अशा माध्यमातून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. परंतु, आजपर्यंत ही रक्कम रोख स्वरूपात घेण्यात येत होती, आता ही दंडाची रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासनाच्या देखरेखीखाली एका खासगी बँकेत दंड आकारणीसाठी खाते उघडण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार ही सुविधा पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसात ऑनलाईन माध्यमातून 2400 रूपयांचा दंड जमा झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून नियम मोडणाऱ्या नागरिकांना आता दंडाची रक्कम ऑनलाईनही भरता येणार आहे. सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा यांना त्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल फोन, क्युआर कोड, क्यु आर कोड फ्लेक्सचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन दंड स्वीकारण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनकडील डे बुक व सर्व वाहतूक शाखांकडील ड्युटी वाटप करणारे पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यापुढील काळात जे नागरिक कोरोनाचे नियम मोडतील ते दंडाची रक्कम पुणे शहर पोलिसांना क्यू आर कोडद्वारे भरू शकतील. आपल्या मोबाईलमधील कोणत्याही यूपीआय अँपद्वारे क्यूआर कोड स्कँन करा आणि दंड भरा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसonlineऑनलाइन