शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

नागरिकांनो काळजी घ्या! खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 2:28 PM

पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा हा पाणीसाठा धरणात जमा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे :खडकवासलाधरण ८२ % टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे खडकवासला पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी यांनी कळविले आहे.

 धरणक्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत १७.२१ टीएमसी म्हणजे ५९.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा हा पाणीसाठा धरणात जमा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३.२७ टीएमसीने म्हणजे ११.१८ टक्के पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे शहरात दर गुरुवारी सुरू असलेली पाणीकपात आणखी काही दिवस कायम राहणार आहे. दि.१ ऑगस्टनंतर धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. आता जुलै महिना निम्मा संपत आला असताना काही पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. यामुळे सोमवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत या चारही धरणांत १७.२१ टीएमसी पाणीसाठा जमा झाल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याचदिवशी चारही धरणांत मिळून एकूण २०.४८ टीएमसी म्हणजे, ७०.२१ टक्के पाणीसाठा होता.

पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून ११.६० टीएमसी, समाविष्ट गावासाठी १.७५ टीएमसी, भामाआसखेड धरणातून २.६७ टीएमसी आणि पवना धरणातून ०.३६ टीएमसी पाणी देण्यात येते. या मंजूर कोट्याव्यतिरिक्त पालिका खडकवासला धरण साखळीतून जादा पाणी उचलते. मंजूर कोटा आणि अतिरिक्त, असे एकूण १६ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून घेण्यात येते. सध्या या चारही धरणांत एकूण १७.२१ टीएमसी पाणीसाठा आहे.

टॅग्स :Damधरणkhadakwasala-acखडकवासलाmula muthaमुळा मुठा