शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मेट्रोमुळे पेठांमधील नागरिकांमध्ये धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 20:48 IST

साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्टेशन असून, ही मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असणार आहेत.

ठळक मुद्देमध्यवस्तीतील ३२५ कुटुंबे बाधित होणार: स्थलांतर करावे लागणार मेट्रो स्टेशनमध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर,न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट याचा समावेशभुयारी मार्गाचे काम करण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार

पुणे: शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरु असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरु होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून, आधुनिक तंत्राचा वापर करून हे काम करण्यात येणार आहे. भुयारी मर्गावर अनेक जुने वाडे, घरे येत असून, भुयारीमार्गाचे काम करताना या जुन्या वाड्यांना, घरांना धोका पोहोचू शकतो. यामुळे तब्बल ३२५ कुटुंबांचे भुयारी मेट्रो मागार्मुळे स्थलांतर करावे लागणार आहे. यामुळे सध्या पेठांमधील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.सध्या  वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १६ किलोमीटरच्या मार्गामध्ये कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा सुमारे ५.२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग जमिनीच्या खाली भुयारी असणार आहे. यामध्ये दोन बोगद्यांमधून येणारी आणि जाणारी अशा दोन मेट्रो धावणार आहे. या कामासाठी महामेट्रोच्या वतीने नुकत्याच निविदा प्रसिध्द केल्या असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोच्या भुयारी मागार्चे प्रमुख प्रमोद  आहुजा यांनी दिली.    या साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्टेशन असून, ही मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असणार आहेत. मेट्रो स्टेशनमध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर,न्यायालय, बुधवार पेठ, मंडई  आणि स्वारगेट याचा समावेश आहे.  या मेट्रो स्टेशनसाठी प्रत्येकी सरासरी १० मीटरच जागा मेट्रोला लागणार आहे. भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने खोदकाम करताना हादरे बसत नाहीत, तसेच कंपने देखील फार दूरवर जात नाहीत. यामुळे भुयारी मार्गामुळे लगतच्या बांधकामांना कोणताही धोका नसल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. असे होणार भुयारी मार्गाचे कामकृषी महाविद्यालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गात एक जाण्यासाठी व एक येणा-या मेट्रोसाठी असे दोन टनेल असणार आहेत. हे भुयारी मार्ग सुमारे १६ ते २८ मीटर खोल असून, यासाठी आधुनिक ४ टनेलिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे. बोगदा करण्यासाठी कृषी महापाविद्यालय आणि स्वारगेट येथे दोन मोठे खड्डे खोदण्यात येणार असून येथूनच साडे पाच किलो मीटरचे बोगदे करण्यासाठी आवश्यक असलेल्या टनेलिंग मशिन मजिनीत घालण्यात येणार आहेत. पुण्यात बहुतेक सर्व ठिकाणी बेसॉल्ट खडक असल्याने कोणत्याही अडचण येणार नसल्याचा मेट्रोचा दावा आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचे काम सुरु झाल्यानंतर किमान एक वर्षे काम पूर्ण होण्यासाठी लागतील.--------------------भुयारी मार्गांवरील मेट्रो स्थानके व खोलीशिवाजीनगर - १६  मीटरसिव्हील कोर्ट - २८  मीटर  बुधवार पेठ- २४  मीटरमंडई- १९  मीटरस्वारगेट- २२  मीटर

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो