लॉकडाऊन काळात नागरिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST2021-05-28T04:08:13+5:302021-05-28T04:08:13+5:30

बारामती : लॉकडाऊन काळात नागरिकांना शासकीय मदत देण्याची मागणी बारामती तालुका काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष रोहित बनकर यांनी ...

Citizens during the lockdown | लॉकडाऊन काळात नागरिकांना

लॉकडाऊन काळात नागरिकांना

बारामती : लॉकडाऊन काळात नागरिकांना शासकीय मदत देण्याची मागणी बारामती तालुका काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष रोहित बनकर यांनी केली आहे.

याबाबत बनकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. परिणामीे अनेक कष्टकरी व हातावर पोट असणारे मजूर यांची उपासमार होत आहे. सध्याची कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. मात्र, अनेक लोकांना हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. सरकार जर अजून काही दिवसांसाठी लॉकडाऊन करणार असेल तर शासनाने प्रत्येक गरजू कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढा किराणामाल व दोन हजार रुपये रोख स्वरूपात मदत करावी, अशी मागणी बनकर यांनी केली आहे.

—————————————

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना रोहित बनकर.

२७०५२०२१ बारामती—०९

Web Title: Citizens during the lockdown