शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 11:49 AM

अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यादिवशी प्रामुख्याने सोने खरेदी शुभ मानली जाते.

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल अधिक होण्याची शक्यता सोने दर ३२ हजार ३०० च्या जवळपास

पुणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीसाठी लोकांमध्ये चांगला उत्साह आहे. तसेच भावही स्थिर असल्याने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यादिवशी प्रामुख्याने सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे काही दिवस आधीपासून लोक सोने खरेदीसाठी बुकींग करून ठेवतात. मागील काही वर्षात त्यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहेत. त्यासाठी सराफी व्यावसायिकांकडूनही आकर्षक ऑफर आणल्या जातात. यंदा सराफी बाजारात अक्षय तृतीयेचा उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल अधिक होण्याची शक्यता आहे. सुमार दोन वर्ष बाजारात काही प्रमाणात मंदीची स्थिती होती. त्यामुळे खरेदी मंदावली होती. यंदा मात्र खरेदीत होत असून अक्षय तृतियेच्या दिवशी त्यावर कळस चढेल, असे व्यावसायिकांनी सांगितले.सराफी व्यावसायिक वास्तुपाल रांका म्हणाले, सोने खरेदीसाठी मागील पंधरा दिवसांपासून बुकींग सुरू आहे. विविध आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. गुढीपाडव्यादिवशी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नागरीकच सोने खरेदी करतात. पण अक्षयतृतियेला महाराष्ट्रासह विविध राज्यातील लोकांकडून सोने खरेदी केली जाते. यावर्षी निवडणुकीच धामधुम संपली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरेदीत उत्साहही दिसून येत आहे. सोने दर ३२ हजार ३०० च्या जवळपास आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपेक्षा यामध्ये चांगली वाढ होईल.--------------मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १५ टक्के जास्त उलाढाल अपेक्षित आहे. सोन्याचे भाव स्थिर आहेत. नोकरदार वर्गाचे पगार झालेले असून लग्नसराईचे मुहूर्त आहेत. तसेच नागरिकांचा गुंतवणुकीकडेही कल वाढला आहे. मागील दोन वर्ष बाजारात काही प्रमाणात  मंदी होती. ही स्थिती आता राहिली नसल्याने अक्षय तृतियेला मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होईल. प्रामुख्याने दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. - सौरभ गाडगीळसराफी व्यावसायिक---------------------

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाGoldसोनंPuneपुणे