बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 04:38 PM2019-07-29T16:38:59+5:302019-07-29T16:41:37+5:30

भरधाव वेगाने जाणाऱ्या कापुस भरलेला माल वाहतूक ट्रक अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाला.

Citizens on the Baramati-Patas road experience the thrill of "burning truck" | बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार

बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार

googlenewsNext

बारामती:  बारामती-पाटस रस्त्यावर सोमवारी(दि २९) वाहनचालक आणि नागरिकांनी बर्निंग ट्रक चा थरार अनुभवला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कापुस भरलेला माल वाहतूक ट्रक उंडवडी सुपे गावच्या हद्दीतील जानाई मळ्याजवळ अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. माल ट्रकने (क्रमांक एम.पी ०९ एच.एच ७८५१) आज (सोमवारी ) पहाटे पाचच्या सुमारास पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने जात असताना अचानक उंडवडी सुपे येथे आल्यानंतर भर रस्त्यातच पेट घेतला.मात्र,ट्रकचालकाला याची माहिती नव्हती.त्यामुळे रस्त्यावरुन पेटलेला ट्रक धावत होता.सुदैवाने यावेळी ट्रक पेटल्याचे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या इतर वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून संबंधित ट्रक चालकाला इशारे करुन सांगितले.

यावेळी गोंधळलेल्या,घाबरलेल्या चालकाने ट्रक बाजुला घेतला.यावेळी ट्रक बाभळीच्या झाडावर गेल्याने गाडीबरोबर झाड देखील  जळुन खाक झाले. घटनेनंतर ट्रकचालक पळुन गेल्याने त्याचे नाव समजु शकले नाहि. प्रसंगावधान राखून ट्रक थांबवून गाडीतून वेळीच बाहेर पडल्याने चालक बचावला. ट्रक काही वेळातच पेटलेल्या ज्वाळांनी वेढला.यामध्ये ट्रक जळुन खाक झाला.त्यामुळे ट्रकमध्ये माल म्हणून कापूस भरला असावा,असा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी गर्दी स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनीच सुपे पोलिसाना फोन करुन माहिती दिली.यावेळी काही वेळातच पोलिस घटनास्थळावर पोहचले. या घटनेनंतर एक - दीड तास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संबंधित ट्रकची आग विझल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. गाडी पेटल्याची माहिती येथील नागरीक शरद तावरे यांनी पोलीस पाटिल व पत्रकारांना दिली . ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी बारामती एमआयडीसीची अग्निशमन दलाची गाडीने विझविण्याचा प्रयत्न केला. आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा मोठा भडका होत असल्याने आग आटोक्यात आणण्यास अपयश आले. बारामती नगरपालिकेची आणखी एक अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली.

Web Title: Citizens on the Baramati-Patas road experience the thrill of "burning truck"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.