शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील या चाैकात पाेलीसांसमाेरच वाजवले जातात वाहतुकीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:18 IST

पुण्यातील विश्रांतवाडी चाैकात वाहनचालकांकडून सर्रास नियम माेडले जात असताना वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीची समस्या जटील झाली अाहे.

ठळक मुद्देवाहतूकीला नाही शिस्तनियम माेडले जात असताना पाेलीस घेतात बघ्याची भूमिका

पुणे :  पुणे तिथे काय उने असे म्हंटले जाते. सगळ्या गाेष्टींमध्ये पुणेकर नेहमीच अाघाडीवर असतात. तसेच अाता वाहतुकीचे नियम माेडण्यातही पुणेकर अाघाडीवर असल्याचे चित्र अाहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागातील मुंकदराव अांबेडकर चाैकात तर वाहतूक पाेलीसांसमाेरच नियम माेडण्यात येत असून पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने या चाैकात वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र अाहे.     पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा पुण्यातील वाहनांची संख्या अधिक झाली अाहे. त्यात दरराेज शेकडाे नव्या वाहनांची भर पडत अाहे. सकाळच्या तसेच संध्याकाळच्या वेळी शहरातील विविध भागात माेठी वाहतूक काेंडी पाहायला मिळते. वाहतूक पाेलीसांकडून वाहनचालकांनी नियम पाळावेत यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येते. परंतु तरीही वाहतूकीचे नियम माेठ्याप्रमाणावर ताेडले जात अाहेेत. विश्रांतवाडीतील मुख्य चाैकात तर नेहमीच नियम सर्रास ताेडले जातात. या ठिकाणचे सिग्नल हे फक्त शाेभेसाठी अाहेत की काय असाच प्रश्न अाता निर्माण हाेत अाहे. त्यातही वाहतूक पाेलीसांनी या ठिकाणची वाहतूक सुरळीत करणे तसेच वाहनचालकांना शिस्त लावणे अपेक्षित असताना, त्यांच्याकडूनही नियम माेडणाऱ्यांकडे कानाडाेळा केला जात असल्याने वाहनचालकांना नियम माेडण्यात कुठलिही चूक असल्याचे वाटत नाही. या चाैकात केव्हाही पाहिलं तरी वाहनचालक झ्रेब्रा क्राॅसिंगच्या पुढेच थांबलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता अाेलांडणे अवघड जाते. त्यातही सिग्नल माेडण्याचे प्रमाणही याठिकाणी माेठे अाहे. 

    मुकुंदराव अांबेडकर चाैकात अनेक रस्ते एकत्र येतात. धानाेरी, एअरपाेर्ट, पुण्याकडून येणारा रस्ता, तसेच अाळंदी कडून पुण्याला जाणारा रस्ता हे सर्व रस्ते या चाैकात एकत्र येतात. या सर्व भागातून पुण्याकडे जाण्यासाठी या चाैकात यावे लागते. त्यामुळे माेठी वाहतूक या भागातून हाेत असते. सकाळी तसेत संध्याकाळच्यावेळी तर माेठी वाहतूक काेंडी या भागात हाेत असते. या सर्व रस्त्यांवरुन येणारे वाहनचालक हे सिग्नल सुटण्याअाधीच पुढे येऊन थांबतात. त्यामुळे ज्यांचा सिग्नल सुटला अाहे त्यांना पुढे जाणे अवघड हाेते. अनेकदा तर निर्भिडपणे सिग्नल ताेडला जाताे. त्याचबराेबर येथील बिग बाजारच्या समाेर संघ्याकाळच्यावेळी अनधिकृत पार्किंग केले जाते. त्यामुळे सुद्धा माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. परंतु वाहतूक पाेलीसांकडून कारवाई हाेत नसल्याने वाहनचालक निर्भीड झाले अाहेत.. धानाेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृतपणे रिक्षांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. या ठिकाणच्या मंदिर व विहारामुळे अाधीच हा रस्ता वाहतूकीसाठी फार कमी उरताे. त्यातही हे रिक्षाचालक रस्त्यातच थांबून प्रवासी घेत असल्याने वाहतूककाेंडीत भर पडत असते. या रिक्षांमधून केवळ तीन प्रवाशींची वाहतूक करणे अपेक्षित असताना 10 प्रवाशांची अनधिकृत वाहतूक केली जाते. त्यातही अनेक रिक्षांचे हेडलाईट बंद असतात तसेच काही रिक्षांना नंबर प्लेट सुद्धा नाहीत. हे सर्व वाहतूक पाेलीसांच्या समाेर चालू असताना पाेलीसांकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते. अांबेडकर जयंती निमित्त विविध मंडळांकडून तयार करण्यात अालेले रथही याच चाैकात ठेवण्यात अाले असून त्यांच्यावरही कुठलिच कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. 

    याबाबत विश्रांतवाडी वाहतूक विभागाचे सहायक पाेलिस निरिक्षक सी.व्ही. केंन्द्रे यांच्याशी फाेनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.   

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसVishrantwadiविश्रांतवाडी