शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

"गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान", चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:14 IST

खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तर आरोप - प्रत्यारोपांचा खेळच सुरु आहे

पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी सुरु झाली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकाही करू लागले आहेत. खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तर आरोप - प्रत्यारोपांचा खेळच सुरु आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषा वापरली होती. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांना टोला लगावला आहे.  शिव्या द्यायला शिवशिवणाऱ्या शिवराळ मनस्थितीचं नाव “सर्वज्ञानी” असं त्या म्हणाल्या आहेत. तर ''गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान'' असा हिंदीतल्या म्हणीतील टोला राऊत यांना लगावला आहे. 

''गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान'' या म्हणीचा अर्थ गाढवाला सन्मान दिल्यावर तो स्वतःलाही साहेबापेक्षा मोठा समजू लागतो. असं चित्रा वाघ म्हणीच्या माध्यमातून सांगत आहेत.  वाघ यांनी त्याखाली #शिवीगाळ हा हॅशटॅगही वापरला आहे. त्यामुळे याबाबत आता सोशल मीडियात चर्चा रंगली आहे.   

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला जात असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. 'देशाच्या राजकारणात मोठे बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार. त्यानंतर देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे ............. लोक नाहीसे होतील," अशी टिपण्णी राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केली होती

सोमय्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते. मी संजय राऊतांना सांगणार आहे की, एकदाच मला शिव्यांची डिक्शनरी देऊन टाका, उगाच माझ्या आईला सारखा सारखा संताप नको, अशा खोचक शब्दांत राऊतांवर पलटवार केला आहे. राऊत आणि सोमय्या यांच्या या शाब्दिक चकमकीमध्ये आता चित्रा वाघ यांनीही हात घातला आहे. 

 'शिव्या द्यायला शिवशिवणार्या शिवराळ मनस्थितीचं नाव “सर्वज्ञानी” गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान,’ असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याखाली त्यांनी #शिवीगाळ हा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे वाघ यांनी राऊतांना जोरदार टोला लगावल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा