वानवडीत चित्रा वाघ यांचा पोलिसांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:11 IST2021-02-26T04:11:54+5:302021-02-26T04:11:54+5:30

वानवडी येथील हेवन पार्क येथे पूजा चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात ...

Chitra Wagh accuses police in Wanwadi | वानवडीत चित्रा वाघ यांचा पोलिसांवर आरोप

वानवडीत चित्रा वाघ यांचा पोलिसांवर आरोप

वानवडी येथील हेवन पार्क येथे पूजा चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तपासाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या पत्रकारांसमोर बोलत होत्या. यावेळी प्रभागातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे, भाजप पुणे कँन्टोमेंट अध्यक्ष महेश पुंडे उपस्थित होते.

पुणे शहर पोलिसांची भूमिका संदिग्ध असून ते हातावर हात ठेवून बसले आहेत. पूजा चव्हाण यांना न्याय मिळावा यासाठी चित्रा वाघ यांची वानवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्यासोबत बाचाबाची झाली व वानवडी पोलिसांवर राग व्यक्त केला. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पालकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे एफआयआर दाखल झाली नाही. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.

फोटो : पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केलेली सोसायटी.

Web Title: Chitra Wagh accuses police in Wanwadi