शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukrain War: बंकरमध्ये ३ दिवस लपून चिप्स, बिस्किट अन् पाण्यावरती काढले दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:34 IST

दैव बलवत्तर म्हणून युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडलो

केडगाव : दैव बलवत्तर म्हणून युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडलो. अजून केडगावला (ता. दौंड) घरी येण्यासाठी ५ दिवस लागणार असले तरी धोका टळला आहे अशी प्रतिक्रिया केडगाव येथील तेजस दिनेश मोहिते या विद्यार्थ्याने केली. तेजस मोहिते हा युक्रेनमधील जाफरोशिया शहरांमध्ये शिक्षण घेत आहे. हे शहर रशियन सैनिकाच्या हिटलिस्टवर होते. प्रसंगावधान राखत तेजस सह जवळपास १५०० विद्यार्थ्यांनी २४ फेब्रुवारी रोजी युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला.

 सुरक्षेसाठी  तीन दिवस हे विद्यार्थी एका बंकर मध्ये लपून बसले होते. यावेळी मोबाईल बंद असल्याने बाहेरील जगाशी कसलाही संपर्क होत नव्हता. चिप्स, बिस्किट व पाण्यावरती दिवस काढत होते. काही दिवस पायी, बसने व ट्रेनने प्रवास करत हे विद्यार्थी दिनांक २ रोजी युक्रेन व हंगेरी देशाच्या सीमेवरती दाखल झाले. यानंतर हंगेरीमध्ये त्यांना १४ दिवसाचा पासपोर्ट मिळणार असून हंगेरीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे मोबाईल मधील सिम बंद झाले. 

हंगेरीत पोहोचण्यापूर्वी शेवटचा व्हिडिओ कॉल तेजसने आपली आई डॉ. वंदना मोहिते यांच्याशी केला मी सुखरूप आहे काही काळजी करू नकोस. आगामी दोन-तीन दिवसांमध्ये विमानाने आम्ही भारतात परतणार असल्याचे त्याने सांगितले. भारतीय चलन नुसार पैसे पाठवण्याची विनंती केली. यावेळी त्याच्यासोबत अनेक भारतीय विद्यार्थी होते. यासंदर्भात तेजसची आई डॉ. वंदना मोहिते म्हणाले की, सर्वांच्या प्रयत्नाने भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका झाली आहे. तेजस जेव्हा केडगाव मध्ये परत येईल तो माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण असेल. असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :daund-acदौंडRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाStudentविद्यार्थीEducationशिक्षण