चिमुरडीवर ७० वर्षांच्या नराधमाने केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:42+5:302021-06-09T04:12:42+5:30
पुणे : कोंढव्यातील एका ७० वर्षांच्या नराधमाने घरात आईवडील नसल्याचे पाहून घरात शिरून एका १० वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ...

चिमुरडीवर ७० वर्षांच्या नराधमाने केला अत्याचार
पुणे : कोंढव्यातील एका ७० वर्षांच्या नराधमाने घरात आईवडील नसल्याचे पाहून घरात शिरून एका १० वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना कोंढवा-सासवड रोडवरील अंतुलेनगर येथे सोमवारी सकाळी ९ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला. याप्रकरणी एका ३७ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ७० वर्षांच्या वृद्धावर गुन्हा दाखल केला. ही महिला व तिचे पती घरी नसताना हा नराधम त्यांच्या घरात आला. त्याने त्यांच्या १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. यापूर्वीही फिर्यादी व तिचे पती घरी नसल्याचा फायदा घेऊन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करीत होता.
सोमवारी सकाळी फिर्यादी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा आरोपीला घरात पाहून फिर्यादीने मुलीला काय झाले म्हणून विचारल्यावर ती रडायला लागली. तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.