अनामत रक्कम म्हणून भरली चिल्लर
By Admin | Updated: February 3, 2017 04:02 IST2017-02-03T04:02:18+5:302017-02-03T04:02:18+5:30
एका मराठी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे प्रसंग गुरूवारी पुण्यातील येरवडा क्षेत्रीय कार्यालयात घडला. एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क ५ हजार रुपयांची

अनामत रक्कम म्हणून भरली चिल्लर
पुणे : एका मराठी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे प्रसंग गुरूवारी पुण्यातील येरवडा क्षेत्रीय कार्यालयात घडला. एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क ५ हजार रुपयांची चिल्लरच निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवली. वेगवेगळ्या नाण्यांच्या स्वरूपात असलेली ही रक्कम मोजताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली. या वेळी बंदोबस्ताला असणारे पोलीस कर्मचारीही निवडणूक अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी सरसावले होते.
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी येथील धनंजय जाधव यांनी उमेदवारी अर्जाची अनामत रक्कमच त्यांनी मतदारांकडून जमा केली. नाण्यांच्या स्वरूपात जमा झालेली ही तब्बल ५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्याच स्वरूपात जमा केली.
घरातील परातीमधून त्यांनी ही सगळी चिल्लर क्षेत्रीय कार्यालयात आणली. त्यांच्यासमवेत बरेच कार्यकर्ते होते. अर्ज दाखल करताना अनामत रक्कम म्हणून त्यांनी चिल्लर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर ठेवली. १ रुपया ते १० रुपयांपर्यंतच्या नाण्यांचा समावेश त्यात होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही सगळी चिल्लर कर्मचाऱ्यांना मोजायला लागली.