"जय गणेश" वर्गातील मुलांनी घेतले योगासनांचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:30+5:302021-06-22T04:08:30+5:30
जय गणेश व्यासपीठाच्या वतीने बुधवार पेठेतील गुजराती शाळेत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना ...

"जय गणेश" वर्गातील मुलांनी घेतले योगासनांचे धडे
जय गणेश व्यासपीठाच्या वतीने बुधवार पेठेतील गुजराती शाळेत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व कळावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासनांची प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या सिद्धेश कडू याने योगासनांचे सादरीकरण केले. यावेळी योगगुरु विठ्ठल कडू, शिरीष मोहिते, पीयुष शाह, जय जवान मित्र मंडळाचे अमोल सारंगकर, पोटसुळ्या मारुती मंडळाचे कुणाल पवार, ऑस्कर मित्र मंडळचे सौरभ घोगरे, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळाचे स्वप्नील दळवी, शिवशक्ती मंडळचे (नाना पेठ) प्रमोद राऊत, अष्टविनायक मित्र मंडळचे (नवी पेठ) प्रणव नवले व किरण सोनिवाल, प्रशांत पंडित, पृथ्वीराज येळवंडे, रोहिणी कदम, सुवर्णा पोटफोडे, उमेश सपकाळ, अक्षय नवले, अक्षय शिंदे, किरण नायकोजी, आनंद मित्र मंडळाचे (कसबा पेठ) सुनील आढव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना पियुष शाह यांची होती.