खेळता खेळता १२ वर्षीय मुलगा इमारतीच्या गच्चीतून खाली कोसळला, जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 21:53 IST2021-02-24T21:53:26+5:302021-02-24T21:53:54+5:30
खेळत असताना इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी येथे बुधवारी (दि. २४) दुपारी ही घटना घडली.

खेळता खेळता १२ वर्षीय मुलगा इमारतीच्या गच्चीतून खाली कोसळला, जागीच मृत्यू
पिंपरी : खेळत असताना इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी येथे बुधवारी (दि. २४) दुपारी ही घटना घडली.
अथर्व दीपक गावडे (वय १२, रा. कोहिनूर शांग्रीला, इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळ, पिंपरी), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व, त्याचा भाऊ व आई घरात होते. त्यावेळी अथर्व आणि त्याचा भाऊ खेळत होते. खेळताना अथर्व हा गॅलरीतून खाली पडला. त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.