शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:26 IST

वॉर्डबॉय, परिचारिका आणि कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून येतायत पुढे... 

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्याचा आढावा

पुणे : पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, त्यामध्ये होत असलेली वाढ, मृत रूग्णांची माहिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना, आवश्यक असलेली मदत आदी सर्वबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सर्व माहिती दिली.पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने कोरोना विषाणू आजाराच्या अनुषंगाने वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री यांना दिली. यामध्ये अनेक वॉर्डबॉय, परिचारिका आणि कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून येतायत पुढे येत असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले. यावेळी पुण्यातून पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुण्याचे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते. डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात तसेच विभागात ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने असून त्यांना भोजन तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. परप्रांतीय मजुरांनाही भोजन व निवास सुविधा देण्यात आली आहे. अन्न-धान्याबाबत कोणतीही टंचाई नसून भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ उचलण्याचे काम सुरु झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार एप्रिल महिन्याच्या अन्नधान्याचे 91 टक्के वाटप झाले आहेत. खरीप पूर्व हंगामाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी खत, बी-बियाणे याबाबत माहिती दिली. खतांचा साठा पुरेसा असून बी-बियाण्यांबाबत नियोजन करण्?यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांबाबतही आवश्यक ती दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी काही वॉर्डबॉय, परिचारिका, कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून पुढे येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलकडून अशा वैद्यकीय तज्ञांची माहिती मिळाल्यास त्यांच्या सेवा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी घेता येवू शकतील, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे