शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By श्रीकिशन काळे | Updated: January 25, 2025 19:35 IST

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार

पुणे : पुण्यात होणाऱ्या विश्व मराठी संमेललाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालय, अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भुषण पुरस्कार’ प्रदान केला जाईल. तर, रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्काराने सांगता समारंभात सन्मानित केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, संमेलन नगरीला पु. ल. देशपांडे यांचे, तर व्यासपीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ यंदा फर्ग्युसन महाविद्यालयात होत आहे. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे उपस्थित होते.सामंत म्हणाले, ‘३१ जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात हे संमेलन होणार असून, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाने दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांच्या काही अडचणी असल्यास, त्यांनी त्या आमच्याकडे मांडाव्यात, त्यातून मार्ग काढू.मराठी विश्वात पोहोचवण्यासाठीच ‘तो’ निर्णय…विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातूनही मराठी बांधव किंवा साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने यावे, मराठीचा डंका जगाच्या पाठीवर वाजावा, असा आमचा हेतू आहे. त्यामुळेच संमेलनाला अमेरिकेतून येणाऱ्या व्यक्तीला ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर, युरोपमधून येणाऱ्यांना ५० हजार आणि दुबईमधून येणाऱ्यांना २५ हजार रुपये दिले जाणार आहे. या खर्चावर टीका करण्यापेक्षा उद्देश समजून घ्यावा, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.‘पुस्तक आदान-प्रदान उपक्रम’आपल्या जवळील पुस्तक देऊन, दुसरे पुस्तक घेऊन जाण्याचा ‘पुस्तक आदान-प्रदान उपक्रम’ या संमेलनात राबवला जाणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.२५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तके देणारसंमेलनात विविध शाळा, महाविद्यालयातील २५ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यांना प्रत्येकी एक पुस्तक भेट दिले जाणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाकडून ही पुस्तके दिली जाणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarathiमराठीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस