शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कालवा फुटीत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:52 IST

कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले़. या पाण्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने अडकले होते़. या परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात जात दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना बाहेर काढले़.

ठळक मुद्देलोहगाव विमानतळावर शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन दोघांचा गौरव

पुणे : मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड आणि संतोष लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी लोहगाव विमानतळावर सत्कार करण्यात आला़. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते़. कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले़. या पाण्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने अडकले होते़. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस काँस्टेबल गायकवाड यांनी याही परिस्थिती स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात जात दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना बाहेर काढले़. जखमी असलेल्या एका लहान मुलाला पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी आणले़. सूर्यवंशी यांनी तीन लहान मुले व त्यांच्या मातांना पाण्याच्या प्रवाहाबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले़. त्यांच्या या धाडसाने सर्वांनीच कौतुक केले होते़. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते़. त्यावेळी लोहगाव विमानतळावर त्यांच्या हस्ते शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन या दोघांचा गौरव करण्यात आला़.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkalwaकळवाPoliceपोलिस