छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगून मागितली खंडणी, महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:10 IST2021-05-19T04:10:51+5:302021-05-19T04:10:51+5:30

प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय ३९ रा. अनिता अपार्टमेंट जांभूळकर चौक, वानवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी या ...

Chhota Rajan's nephew demanded ransom, woman arrested | छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगून मागितली खंडणी, महिलेला अटक

छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगून मागितली खंडणी, महिलेला अटक

प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय ३९ रा. अनिता अपार्टमेंट जांभूळकर चौक, वानवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील इतर आरोपी धीरज बाळासाहेब साबळे (वय २६, रा.मु.पो. धानोरे, विकासवाडी, ता.खेड) आणि मंदार सुरेश वाईकर ( वय ४१ रा. वनतेय सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रोड) यांना अटक केली आहे. याप्रकरणी राजेश जवळेकर (वय ४८) यांनी फिर्याद दिली. ही घटना ८ मार्च ते १३ मार्च २०२० दरम्यान हॉटेल अरोरा टॉवर लष्कर भागात घडली. आरोपी महिलेने संगनमत करून फिर्यादींना त्यांची पत्नी व मेव्हणीने माझ्याकडे तक्रार केली आहे. तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी माझ्या लेटरहेडवर भारती विद्यापीठ येथे तक्रार अर्ज केला आहे. जर तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायचा नसेल, तर मला ५० लाख रुपये द्यावे लागतील. मी २५ लाख घेईन आणि उर्वरित तुमची पत्नी, मेव्हणी आणि मंदारला देणार आहे, असे आरोपी प्रियदर्शनी हिने फिर्यादींना सांगून पिस्तुलचा धाक दाखवून धमकावले. जर ५० लाख रुपये दिले नाहीत आणि पत्नीला घटस्फोट दिला नाहीस तर तुला गोळ्या घालून ठार मारले जाईल. मी छोटा राजनची सख्खी पुतणी आहे. जीव प्यारा असेल तर सांगितलेले ऐक, त्याचे परिणाम भोगावे लागतील. फिर्यादींना इतकी मोठी रक्कम देणे शक्य न झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून धीरज साबळे याला घटनास्थळी रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे हिला १८ मे रोजी अटक करून पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हस्तगत करायचे आहे तसेच, हे पिस्तूल कुठून आणले? या गुन्ह्यात छोटा राजनचा प्रत्यक्ष काही संबंध आहे का? याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे सरकारी वकील संतोषकुमार पटले यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

--------------------

Web Title: Chhota Rajan's nephew demanded ransom, woman arrested