शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

‘छत्रपती’च्या निवडणुकीतून पहिल्याच दिवशी किरण गुजर यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:31 IST

- गुजर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने विविध राजकीय अफवांना पुर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.

बारामती - भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणुक प्रक्रिया सुरु आहे.गुरुवारी(दि १७) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी उपमुखख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे  किरण गुजर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.गुजर यांच्यावर सर्वपक्षीय पॅनलच्या समन्वय साधण्याची जबाबदारी देखील आहे.गुजर यांनी उमेदवारी  अर्ज माघारी घेतल्याने  विविध राजकीय अफवांना पुर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.किरण गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची राजकीय भुमिका स्पष्ट केली आहे.गुजर म्हणाले,श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या अत्यंत वाइट अवस`थेतून जात आहे.कारखान्याला पुर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार आहे.त्यासाठी पृथवीराज जाचक यांना नेतृत्वाची संधी दिली आहे.जाचक हे सक्षम नेतृत्व आहेत,जे कारखान्याला पुर्वीचे दिवस आणत पुन्हा नावारुपाला आणतील.मात्र,सुरवातीच्या काळात जाचक यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी एकटे पाडल्याच्या चर्चा झाल्या.त्या चर्चा थांबविण्यासाठी,जाचक यांना आमचा पाठींबा आहे,हे दर्शविण्यासाठी  सुरवातीला माझा उमेदवारी अर्ज  दाखल केला.सहकारामध्ये चांगला अभ्यास आहे,चांगला ऊसधंदा असणार्यांनी अर्ज दाखल करावेत,अशी पवार यांची इच्छा आहेत.त्या दृष्टीने देखील माझा प्रयत्न होता.मात्र,आज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.सर्व सभासदांना माझी नम्र विनंती आहे.आपण प्रत्येकाने समजुन घ्यावे.कारखान्यासाठी कोणाची गरज आहे,आपली या ठीकाणी आवश्यकता आहे का,याबाबत सर्वांनी विचार करावा. शिवाय अजुनहि किरण गुजर यांना जाचक यांच्यासमोर उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडुन पर्यायी नेतृत्व निर्माण केले जात असल्याच्या अफवा जात  होत्या.याबाबत स्पष्ट संदेश जाणे आवश्यक होते.सभासदांना चुकीचा संदेश जावू नये. कारखान्याला निवडणुक प्रक्रिया परवडणारी नाही.जाचक यांच्याच हाती कारखाना द्यावा,त्यांचीच तिथ गरज आहे. हे स्पष्ट करण्याच्या भावनेतूनच माझा उमदेवारी अर्ज मागे घेतल्याचे गुजर म्हणाले.दरम्यान,बुधवारी(दि १६)पार पडलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत १६९ अर्ज अवैध ठरले आहेत.तर ४३१ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.यामध्ये सणसर गटातून ५५ जण सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे.तसेच लासुर्णतून २८,उध्दट ३५,अंथुर्णे ४०,साेनगांव ४४,गुणवडी ३५, ब वर्ग मधुन २५, तसेच अनुसुचित जाती जमाती १८,महिला राखीव प्रतिनिधी ५३,इतर मागास प्रवर्ग २४,भटक्या विमुुक्त जाती व जमाती विशेष मागास मधुन ७४ जणांनी उमदेवारी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024Sugar factoryसाखर कारखाने