शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : शिवजंयतीनिमित्त मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:53 IST

विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य वस्तीतील वाहतुकीत बुधवारी, आज (दि.१९) बदल करण्यात येत

- अंबादास गवंडी पुणे : शिवजयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती भागांतील लक्ष्मी रोड, शिवाजी रोडवरुन मिरवणुका निघतात. तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन केलेले आहे. यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य वस्तीतील वाहतुकीत बुधवारी, आज (दि.१९) बदल करण्यात येत आहेत.- जंगली महाराज रोडवरील वाहतूक संचेती हॉस्पिटल चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : इंजिनिअरिंग कॉलेज चौकातून येणारी वाहने डावीकडे कामगार पुतळा मार्गे, नेहरु रोड इच्छितस्थळी जाता येईल.- फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय गेट, वीर चाफेकर चौकापर्यंत आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.पर्यायी मार्ग : कोथरुड, कर्वे रोड, एसएनडीटी कॉर्नर मार्गे लॉ कॉलेज रोड, एसबी रोड मार्गे व नळस्टॉप चौकयेथून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.- टिळक रोडवरुन खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : अलका टॉकीज चौकातून शास्त्री रोडने सेनादत्त चौक, बालशिवाजी - नळस्टॉप मार्गे इच्छित स्थळी जातील.- केळकर रोडवरुन झेड ब्रीजमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : गरुड गणपती चौक, टिळक चौक, शास्त्री रोडने इच्छित स्थळी जातील.येथे असेल वाहन पार्किंग१) खडकी, येरवडा आरटीओकडून येणाऱ्या वाहनांनी इंजिनिअरींग कॉलेजचौकात वळून संगमवाडी येथे वाहने पार्किंग करावीत.२) कर्वे रोड, कोथरुडकडून येणाऱ्या वाहनांनी अलका टॉकिज चौकातडावीकडे वळून नदीपात्रात पार्किंग करावी.३) स्वारगेट, हडपसर, दांडेकर पुलकडून येणारी वाहने सेनादत्त मार्गे अलकाटॉकिज चौकातून नदी पात्रातील पार्किंग येथे पार्क करतील.४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पाषाण, बाणेर या रोडने येणारी वाहने शिमला ऑफिस चौकात यू टर्न करुन ॲॅग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंडवर पार्क करतील. जय शिवाजी जय भारत पदयात्राही पदयात्रा इंजिनिअरिंग कॉलेज ग्राऊंड, स. गो. बर्वे चौक, मॉर्डन चौक, झाशी राणी चौक, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान अशी जाणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक सकाळी ७ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान बदल करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज