शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भिडेवाड्यात पुन्हा मुलींची शाळा निर्माण करणार - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:15 IST

Chhagan Bhujbal : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

पुणे : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित १३१ वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिनाचे औचित्य साधून रविवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना समता पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी छगन भुजबळ होते. व्यासपीठावर मध्य प्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार पंकज भुजबळ, दीप्ती चौधरी, कमल ढोले पाटील, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, प्रा. हरी नरके, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.भुजबळ म्हणाले, भिडेवाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल. फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक भूमी संपादन प्रक्रिया पूर्ण करून कामास तात्काळ प्रारंभ करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येईल. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी त्याचे अनावरण केले जाईल. संविधान धोक्यात आले आहे. संविधान नष्ट झाले तर तुमचे अस्तित्व धोक्यात येईल. महात्मा फुले यांच्या वेळी जे धोके होते, ते आजही आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी केलेले समाज सुधारण्याचे कार्य महत्त्वपूर्ण आहे, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळPuneपुणे