शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

आईसह प्रियकराकडूनही चैतन्यला मारहाण

By admin | Updated: August 8, 2015 00:51 IST

चैतन्यच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. आई राखी व तिचा प्रियकर सुमित मोरे यांनी केलेल्या मारहाणीमुळे चैतन्यचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

येरवडा : चैतन्यच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. आई राखी व तिचा प्रियकर सुमित मोरे यांनी केलेल्या मारहाणीमुळे चैतन्यचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. राखी व सुमित यांच्यातील अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाण झाल्यापासून चैतन्यला ससूनमध्ये नेईपर्यंत त्याच्या शेजाऱ्यांना या प्रकरणाची अजिबातच कल्पना नव्हती. बुधवारी मध्यरात्रीनंतर ससूनमध्ये नेल्यानंतर राखीने इमारतीतील शेजारील महिलेला दूरध्वनीवरून चैतन्यच्या निधनाची बातमी कळवली होती. चैतन्यच्या आकस्मिक मृत्यूमुुळे तो राहत असलेल्या इमारतीतील मुले, महिला व नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. येथील महिला व लहान मुले अद्यापही यातून सावरलेले नाहीत. त्याच्या खुनामध्ये आई राखी बालपांडेचाच सहभाग असल्याचे पाहून सर्वजण संताप व आश्चर्य व्यक्त करीत आहेत.चैतन्य हा दीड-दोन वर्षांपासून आई, आजी व मावशीसमवेत टिंंगरेनगरमधील एस. बी. एनक्लेव इमारतीतील पहिल्या मजल्यावरील क्रमांक दोनच्या सदनिकेत राहत होता. चैतन्यला आजार असल्याने व्यवस्थित चालता येत नव्हते. तो दोन्ही पायांच्या टाचा वर करून बोटांवर चालत असे. राखीने तिची बहीण व आईसमोरही चैतन्यला अनेक वेळा मारहाण केली होती. या दोघींनीही तिला समजून सांगूनही राखीच्या वागण्यात फरक पडत नव्हता. राखीच्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिची बहीण ठाण्यातील पतीच्या घरी गेली. त्यानंतर अलीकडील काळात तर राखी चैतन्यला नीट जेवणही देत नव्हती. यावरून राखी व तिच्या आईमध्ये अनेक वेळा वादावादी होत असे. मात्र, एके दिवशी राखीने आईलाच मारहाण करून घराबाहेर काढले. त्यामुळे तिची आई आठवडाभरापूर्वीच नागपूरला राहायला गेल्याचे या इमारतीतील रहिवाशांनी सांगितले.राखी चैतन्यचा नीट सांभाळ करीत नसल्याने राखीची आई व बहिणीला त्याची काळजी वाटत होती. त्या दोघीही इमारतीतील महिलांशी संपर्कात होत्या. राखी चैतन्यला दिवसभर घरात कोंडून कामावर जात होती. राखी घरात नसताना तरी त्याला काहीतरी खायला द्या व त्याच्यावर लक्ष ठेवत जा, असे या दोघीही या इमारतीतील शेजाऱ्यांना नेहमी विनंती करीत असत. मात्र, राखीने सदनिकेच्या सर्व दरवाजांना कुलूप लावून चैतन्यला आतमध्ये कोंडण्यास सुरुवात केल्याने शेजाऱ्यांनाही त्याला काहीही मदत करता येत नव्हती. ही बाब त्यांनी राखीच्या आईलाही कळवली होती. चैतन्यला त्याच्या वडिलांकडे पाठवा अथवा ही बाब पोलिसांना कळवा, असेही शेजाऱ्यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, कुणी काही करण्याच्या आधीच चैतन्यवर काळाने घाला घातला. दरम्यान, विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई करत राखी हिच्यासह सुमीत मोरे यालाही अटक केली आहे. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिला न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिचा प्रियकर सुमीत मोरे यालाही अटक करण्यात आली आहे.