शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

रासायनिक प्रकल्पातील स्फोटाने अस्वस्थ कुरकुंभ ! अपघाताच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:47 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले. दरम्यान, आगीचे स्वरूप जरी कमी असले व त्यातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा अन्य कुठल्याही प्रकारे अनुचित घटना जरी घडली नसली तरी अशी परिस्थिती निर्माण होणेदेखील गंभीर आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक प्रकल्पातील सर्वात मोठे असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपातील रासायनिक कारखाने उभारले गेले आहेत.परिणामी या मोठ्या कारखान्यांमधून होणारे रासायनिक पाण्याचे व वायूचे प्रदूषणदेखील मोठ्या स्वरूपात आहे. जवळपास दोनशे छोटे-मोठे प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित असून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालदेखील होत आहे. कुरकुंभ येथील नागरिकांचे राहणीमान जरी उंचावले असले तरी त्यासोबत प्रदूषण व रासायनिक प्रकल्पातील स्फोटातील अपघाताने मात्र रोजचे जीवनमान अतिशय दहशतीचे करून टाकले आहे.अतिशय घातक रसायने, वायू व त्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे येथील पाणी, हवा दूषित झालेले आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष परिणाम येथील नागरिकांच्या जीवनमानात दिसून येतो आहे. वारंवार होणाºया अपघाताने कित्येक कामगारांनी आपला प्राणदेखील गमावला आहे, मात्र तरीही अपघात ही नित्याचीच बाब झाली असल्याचे पाहावयास मिळते. धुरांच्या लोटाने नागरिकांच्या मनात एक प्रकारे दहशत निर्माण झालेली दिसून येते. कारण कुठल्या प्रकरचा वायू हवेतून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे सांगणे कठीण असते. अपघाताची गंभीरता मोठीअसल्याने सगळीकडे एकच पळापळ उडते. यामध्ये अफवांचे पेवदेखील फुटतात, त्यामुळे भीतीचे वातावरण आणखीच वाढते.कामगारांचीसुरक्षा धोक्यातचघातक प्रक्रिया होत असताना लागणाºया सुरक्षाव्यवस्था या अपुºया आहेत. मोठ्या स्वरूपातील लागलेल्या आगीचे नियंत्रण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. परिणामी जोपर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी येथे पोहोचतात तोपर्यंत होत्याचे नव्हते होऊन जाते. रासायनिक अभिक्रियेत शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखण्याची यंत्रणादेखील कार्यान्वित नाही, त्यामुळे सामान्य कामगाराचा जीव हा अगदीच सामान्य असल्याची पावतीच मिळते. छोट्या उद्योगातून तर सुरक्षेच्या नावालादेखील जागा नसते. नावाला सुरक्षा उपकरणे असतात, मात्र त्याचा उपयोग किती होतो, यावरच प्रश्नचिन्ह आहेत. एकंदरीतच या ठिकाणाच्या सुरक्षा यंत्रणेलाच सुरक्षा पुरवण्याची गरज भासू लागली आहे.नियंत्रणे नाहीतजवळपास हजार एकरपेक्षा जास्त जागेत बसलेल्या या औद्योगिक प्रकल्पात दोनशे उद्योग आहेत, तरीदेखील यांच्यावर नियंत्रण करणाºया यंत्रणा या पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी शहरात असतात. त्यामुळे हे नियंत्रण फक्त नावालाच आहे.उत्पादनवाढीकडे लक्षकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये रासायनिक प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घातक रासायनिक प्रयोगांना महत्त्व दिले जाते. ही रसायने अतिशय महाग असल्याने कुठल्याही प्रकारे उत्पादन मिळणे हे अत्यंत गरजेचे असते.परिणामी एखाद्या वेळेस यांच्या रासायनिक अभिक्रिया करताना निर्माण झालेल्या अडचणी कामगारांना न सांगताच त्यांच्याकडून, तसेच काम करून घेताना बºयाच वेळा अपघात होतात. काही महाभाग तर प्रकल्प पूर्ण होण्याआधीच उत्पादने घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळेदेखील अपघात झाल्याची घटना या ठिकाणी घटलेल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे