कंपनीत काम न देता महिलेची केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:47+5:302021-09-02T04:25:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका २१ वर्षांच्या तरुणीला बनावट फेसबुक अकाऊंट काढून देऊन ...

कंपनीत काम न देता महिलेची केली फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीत काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका २१ वर्षांच्या तरुणीला बनावट फेसबुक अकाऊंट काढून देऊन त्यावरून कंपनीची जाहिरात करून तिची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी अभिजित अर्जुन सुतार (वय २५, रा. शिवणे) याच्यासह अन्य साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी तरुणीला कामाची गरज असल्यामुळे त्यांनी शिवणेतील लाईमलाईट ट्रेन्डस प्रा. लि. कंपनीत संपर्क साधला. त्यावेळी दोघांनी त्यांना काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी फोन पे आणि गुगल पेवर मिळून १० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. काम मिळण्याच्या अपेक्षेने तरुणीने संबंधितांच्या खात्यावर १० हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतरही आरोपींनी त्यांना काम न देता फसवणूक केली. तसेच फिर्यादी तरुणीस बनावट फेसबुक खाते काढून देऊन त्यावर कंपनीची जाहिरात करण्यास भाग पाडले. पोलीस उपनिरीक्षक शिवानंद गायकवाड तपास करीत आहेत.