शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लवासासारख्या प्रोजेक्टसाठी १०० कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक करणारा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 21:19 IST

लवासा सिटीसारखा प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अल्प व्याजात मिळवून देण्याचे आमिष दाखवून खर्चासाठी म्हणून तब्बल ५५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे़.  

पुणे : लवासा सिटीसारखा प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अल्प व्याजात मिळवून देण्याचे आमिष दाखवून खर्चासाठी म्हणून तब्बल ५५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे़.  जतिन वीरेंद्र ध्रुव (वय ३३, रा़ कांदिवली, मुंबई) असे त्याचे नाव आहे़.  त्याचा साथीदार जयेश नंदलालभाई गुंचाला हा फरार आहे़. गेली दोन वर्षे तो पोलिसांनी हुलकावणी देत होता़.  या प्रकरणी पृथ्वीराज खामकर (रा़ तावरे कॉलनी, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरुन २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता़.                   याबाबत पोलिसांनी सांगितले की, जतिन धु्रव हा ग्लोबल इन्फ्रा अँड फायनान्शिअल या कंपनीचा सीईओ असल्याचे भासवत होता़.  या कंपनीमार्फत त्याने खामकर यांना ई मेले, एसएमएस करुन कंपनीच्या माध्यमातून लवासा सिटीसारखा मुळशी तालुक्यात १२०० एकर जागेवर प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था तसेच खासगी गुंतवणुकदारांकडून अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देतो असे सांगितले़ . हा प्रोजेक्ट ५५ हजार कोटी रुपयांना विकत घेतो, असे आमिष दाखविले़ त्यासाठी वेगवेगळ्या मिटिंग घेऊन तसेच कर्ज मंजूरी प्रक्रियेसंदर्भात बनावट मेल व एसएमएस पाठविले़ त्यांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी ५५ लाख रुपये घेतले़.  त्यानंतर कोणतेही कर्ज प्रकरण न करता पोबारा केला होता़.              या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर हे करीत होते़. जतिन हा गेली दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता़. तो कांदिवली येथे त्याची ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़.  त्याअनुषंगाने त्याच्यावर पोलिसांनी १५ दिवसांपासून गुप्त पाळत ठेवली होती़.  त्याचे राहते ठिकाण, घरात राहणाऱ्या व्यक्ती, तो नोकरी करीत असलेले ठिकाण, त्याच्या कामावर जाण्या येण्याच्या वेळा यांची माहिती गोळा करुन तो काम करीत असलेल्या बांद्रा येथील रिर्सजंट इंटिग्रेटस प्रा़ लि़ कंपनीतून त्याला नुकतेच ताब्यात घेण्यात आले़.  सध्या तो पोलीस कोठडीत आहे़.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, सहायक निरीक्षक शंकर सलगर, पोलीस शिपाई भारत आस्मर यांनी ही कामगिरी केली़.  

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी