शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

सतरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी फरार आरोपीला साताऱ्यातून अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:12 IST

आरोपीने सासवड बाजारपेठेतील फिर्यादीच्या दुकानातून १७ लाख ९७ हजार ८१६ रुपये किमतीचे सिमेंट खरेदी करत त्याची परस्पर विक्री करून फसवणूक केली होती.

ठळक मुद्देया फसवसणुकप्रकरणी सुधीर माणिकचंद मुथा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार

लोणी काळभोर : दोन वर्षापूर्वी परस्पर सिमेंटची विक्री करुन सतरा लाख ९७ हजार ८१६ रुपयांची व्यापा-याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने यश मिळवले आहे.योगेश कांतीलाल शहा ( वय ३८, रा.नºहे रोड, धायरी,सध्या रा.विकासनगर, सातारा ) यास अटक करण्यात आली आहे .      स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,या फसवसणुकप्रकरणी सुधीर माणिकचंद मुथा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.सुधीर मुथा यांचे सासवड बाजारपेठ येथे मुथा अँड सन्स एसीसी सिमेंट नावाचे डिलरशिप दुकान आहे. या ठिकाणावरून शहा याने मुुुथा यांचा विश्वास संपादन करून दुकानातून १७ लाख ९७ हजार ८१६ रुपये किमतीचे सिमेंट खरेदी करत त्याची परस्पर विक्री करून फसवणूक केली होती. हा गुन्हा केल्या पासून शहा फरार झाला होता तो सातारा येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळाली. त्यानंतर सदर पथकाने सातारा येथे जाऊन माहिती गोळा करण्यात सुरवात केली. सदर आरोपी सातारा येथील आदर्श नगर चौकात येणार असल्याचाी माहिती वरील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.  शहावरसासवड व नारायणगाव पोलीस ठाण्यासह विविध ठिकाणी फसवणूकीचे गुन्हे दाखल गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस पुढील तपास करत आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर