ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:06 IST2018-01-24T13:03:34+5:302018-01-24T13:06:36+5:30

रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

cheat Ola Company by employees worth 25 lakh; despoil The customer's money | ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप

ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप

ठळक मुद्दे२०१७ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान घडला प्रकार कंपनीकडून करण्यात आलेल्या आॅडिटमध्ये लक्षात आला प्रकार

पुणे : रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ 
कंपनीचे सोर्सिंग एक्झिक्युटिव्ह अमोल पिलानी, रेणुका कुलकर्णी, कॅशिअर रामदास चितळकर, सोर्सिंग टीम असिस्टंट मॅनेजर कुशांक उपाध्याय आणि आॅन रोडिंग एक्झिक्युटिव्ह ब्रिजेश वाघवाले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ या प्रकरणी नितीन गागरे (वय ३३, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१७ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान घडला आहे़ 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गागरे हे रामवाडी येथील ओला कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात़ यातील आरोपी वेगवेगळ्या पदांवर नोकरीस होते. आरोपींनी आपापसात संगनमत करून कंपनीच्या ग्राहकांना ओला कंपनीची गाडी चालविण्यास दिली. तसेच, त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यांना ओला कंपनीची बनावट पावती दिली. मात्र, ग्राहकांकडून घेण्यात आलेले २५ लाख रुपये कंपनीत न भरता स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी ठेवून अपहार करून कंपनीची फसवणूक केली. कंपनीकडून करण्यात आलेल्या आॅडिटमध्ये हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर गागरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, पाच जणांवर अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जी़ जी़ मोरे करत आहेत.

Web Title: cheat Ola Company by employees worth 25 lakh; despoil The customer's money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.