शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

स्वस्तात सोन्याचा मोह पडला ४३ लाख रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 2:28 AM

मुकेश सूर्यवंशीचे कारनामे, आई-वडिलांचीही साथ, लुकआऊट नोटीशीमुळे जाळ्यात

पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या मुकेश सूर्यवंशी याने पुण्यातील एका महिलेला तब्बल ४३ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला होता. पुणे पोलिसांनी इंटरपोलमार्फत काढलेल्या लुकआऊट नोटिशीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडू शकला. याप्रकरणी बाणेर येथील २८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादी यांची  सूर्यवंशी याच्याशी जानेवारी २०१८ मध्ये ओळख झाली.  सूर्यवंशीने  आपला सोन्याचा व्यवसाय असून त्यात गुंतवणूक करा, असे सुचविले.  २७ हजार रुपये तोळा दराने सोने घेऊन जादा फायदा मिळवू शकता.

गुंतवणुकीच्या रकमेवर दर २५ दिवसांनी परतावा देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने नाशिकला जाऊन तो खरंच हा व्यवसाय करतो का, याची खात्री केली. त्याच्या आई-वडिलांना भेटल्या. त्यानंतर मुकेश सूर्यवंशी याच्या बँक खात्यात वेळोवेळी एकूण ४२ लाख ८० हजार रुपये गुंतवले. त्यावर मुकेशने १७ लाख ५९ हजार रुपये परतावा म्हणून देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जुलै २०१८ नंतर परतावा देणे बंद केले. महिलेने त्याचे वडील ईश्वर सूर्यवंशी यांना फोन करून सांगितले. तेव्हा त्यांनी मी आता मीटिंगमध्ये आहे. मला १० लाख रुपये मिळणार आहेत. ती रक्कम मी तुला देतो, सध्या मला ५५ हजार रुपयांची गरज आहे, असे सांगून पैसे बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांना ५५ हजार रुपये पाठविले. शेवटी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.  त्यानुसार पोलिसांनी मे २०१९ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तोपर्यंत मुकेश दुबईला पळून गेला होता. पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली होती. 

दुबईतून गोव्यात आल्यानंतर अटकn तीन वर्षे दुबईत राहिल्यानंतर तो मार्च महिन्यात गोव्याला परत आला. पोलिसांनी त्याला विमानतळावरच पकडले. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ मार्च रोजी गोवा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. n पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून सोने अथवा रोख रक्कम हस्तगत करता आली नाही. त्यानंतर त्याला मुंंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी